शिक्षकांनो मिळालेला वारसा जोपासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:02 AM2021-04-05T04:02:57+5:302021-04-05T04:02:57+5:30
लोकसंवाद फाउंडेशनतर्फे रविवारी सकाळी ‘संवादमाला’ या कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन केले होते. या संवादमालेचे पहिले पुष्प प्रा. जयदेव डोळे यांनी ...
लोकसंवाद फाउंडेशनतर्फे रविवारी सकाळी ‘संवादमाला’ या कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन केले होते. या संवादमालेचे पहिले पुष्प प्रा. जयदेव डोळे यांनी ‘शिक्षण आणि स्वातंत्र्य’ या विषयावर संवाद साधून गुंफले. फाउंडेशनचे अध्यक्ष डाॅ. राजेश करपे अध्यक्षस्थानी होते.
प्रा. डोळे म्हणाले की, सध्या देशभर प्रतिगामी शक्तींनी डोके वर काढले आहे. लोकशाही, संविधानाच्या मूल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी शिक्षकांवर आली आहे. शिक्षण आणि स्वातंत्र्य या भिन्न गोष्टी आहेत, हे न विसरता विद्यार्थ्यांना समजावून सांगितले पाहिजे.
सध्या देशपातळीवर दडपशाही, धाक निर्माण करणारे वातावरण तयार केले जात असून यातूनच लोकशाही, संविधानाचे मूल्य, तत्त्व आणि अधिकाराला डावलण्याचा प्रयत्नही केला जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षकांनाच ही तत्त्व रुजविण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार असल्याचेही प्रा. डोळे म्हणाले.
डॉ. करपे यांनी प्रास्ताविक केले. गणेश मोहिते यांनी संचालन केले. तर डॉ. बळीराम धापसे यांनी आभार मानले. निखील भालेराव यांनी तांत्रिक साहाय्य केले. डॉ. राम चव्हाण, डॉ. स्मिता अवचार, डॉ. मारोती तेगमपुरे यांच्यासह अनेक मान्यवरांची ऑनलाईन उपस्थिती होती.