निकोप जीवनशैलीतून मधुमेहासारख्या गोड शत्रुला रोखा
By Admin | Published: April 6, 2016 11:57 PM2016-04-06T23:57:11+5:302016-04-07T00:32:06+5:30
बीड: देशात सुमारे ६२ दशलक्ष जणांना हा विकार झाल्याचे इंटरनॅशनल डायबेटिस फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे.
बीड: देशात सुमारे ६२ दशलक्ष जणांना हा विकार झाल्याचे इंटरनॅशनल डायबेटिस फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे. २०३५ पर्यंत भारतात १०९ दशलक्ष मधुमेही रु ग्ण असतील अशी भीती इंडियन हार्ट असोशिएशनने व्यक्त केली आहे. यामुळे निकोप जीवनशैलीने मधुमेहासारख्या गोड शत्रुला दुर ठेवणे ही गरज बनली असल्याचे मत डॉ. संजय जानवळे यांनी व्यक्त केले.
जागतिक आरोग्य दिना विषयी डॉ. जानवळे यांनी मधुमेहाबाबतची सद्यस्थिती व त्यावर उपाय योजना ‘लोकमत’शी बोलताना बुधवारी सांगितल्या. एका सर्वेक्षणानुसार शहरी भागात मधुमेहाचे प्रमाण अंदाजे १२ ते १३ टक्के असून ग्रामीण भागात हेच प्रमाण दोन ते तीन टक्के आहे. खरं तर हा विकार काही नव्याने उद्भवलेला नाही. मात्र त्याचे वाढते प्रमाण भयावह व चिंताजनक आहे. यापुर्वीही अनेक सर्वेक्षणातून त्याच्या वाढत्या प्रमाणाचे इशारे अनेकदा देण्यात आले होते पण परिस्थितीत काहीच सुधारणा झाली नाही, अशी खंत डॉ. जानवळे यांनी व्यक्त केली.
बिघडलेली जीवनशैली मधुमेहास कारणीभूत आहे. पस्तीशीच्या पुढे होणारा रोग आहे. मेहनतीचा अभाव व आयोग्य आहार यामुळे होणाऱ्या प्राकृतिक बिघाडामुळे हा रोग होतो. यातील काही घटक आनुवंशिक असतात. आनुवंशिकता, अयोग्य आहार, स्थुलपणा व बैठे काम ही मधुमेहाची प्रमुख कारणे होत. वाढणारे ताणतणाव, कोंडा व तंतूविरहीत धान्ये खाण्याची सवय, चरबीयुक्त विशेषत; दुग्धजन्यपदार्थ पदार्थ म्हणजे लोणी, तूप,चीज यासारख्या गोष्टींचा वाढता वापर ,रात्री उशिरा पर्यंतचे जागरण, आहारात निकस पोटभरु पदार्थांचा समावेश ही मधुमेह वाढण्याची काही प्रमुख कारणे. याच कारणांमुळे भारतात मधुमेहाचे प्रमाण बेसुमार वाढत आहे. मजूर,शेतकरी यापेक्षा बौद्धिक व्यवसाय करणाऱ्यांलोकांत हे प्रमाण जास्त आहे.
वारंवार लघवी होणे, जास्त तहान व भूक लागने ही या रोगाची ढोबळ लक्षणे होत. भूक लागूनसुध्दा या रोगात जास्त अशक्यता जाणवते. मधुमेहाबद्दल जनमानसात जागृकता असूनही या विकारावर नियंत्रण नसल्याचे दिसते.
४धूम्रपान करणाऱ्या मधुमेहींनी सिगारेट ओढणे बंद केले पाहीजे . मधुमेही रूग्णांनी आपल्या आहारात तेल , तुप , साखर यांचा वापर कमी ठेवावा , त्याचबरोबर प्राणीजन्य चरबी मार्गारीन , लोणी , साय , फास्टफूड , वनस्पतीजन्य चरबी या पदार्थांच प्रमाण कमी कराव, शर्करायुक्त पेये वर्ज करावेत, रक्तदाब असणाऱ्यांनी नियमति रक्तदाबाची तपासणी करावी, आहारात मिठाचे प्रमाण मर्यादेत असावे, चौरस ,संतुलित व कमी उष्मांक देणारा आवश्यक तेवढाच आहार घेऊन वजन आटोक्यात ठेवावे, असा सल्लाही डॉ. संजय जानवळे यांनी
दिला आहे.