पाल्यांचे ऑनलाईन शिक्षण रोखल्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:05 AM2021-06-22T04:05:47+5:302021-06-22T04:05:47+5:30
औरंगाबाद : जैन इंटरनॅशनल स्कूलने पालकांना पुढील ३ दिवसांत बाकी असलेले शुल्क भरा अथवा तुम्ही पाल्याचा प्रवेश काढून घेतल्याचे ...
औरंगाबाद : जैन इंटरनॅशनल स्कूलने पालकांना पुढील ३ दिवसांत बाकी असलेले शुल्क भरा अथवा तुम्ही पाल्याचा प्रवेश काढून घेतल्याचे समजण्यात येईल असे पत्र दिले आहे. त्यामुळे पालकांनी शिक्षणाधिकारी कार्यालय गाठून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याची मागणी केली.
शिक्षणाधिकारी कार्यालयात जैन इंटरनॅशनल स्कूल, वुडरिच हायस्कूल, टीसीएच, पीएसबीए शाळेचे पालक जमले होते. शिक्षणाधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही निवेदन देत वारंवार निवेदने देऊन कारवाई रखडलेल्या कारवाईला गती देण्याची मागणी केली. योग्य कार्यवाहीची ग्वाही शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून दिल्या गेल्याचे पालक संघटनेचे उदयकुमार सोनोने यांनी सांगितले. पालक स्वप्निल चांदिवाल, योगेश काला म्हणाले, विभागीय शिक्षण उपसंचालकांनी आदेश देऊनही ऑनलाईन लिंक सुरू न केल्याने मुलीचे शिक्षण बंद आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचे सांगण्याची मागणी केली. दरम्यान, मनसेने चार दिवसांत संबंधित शाळांवर कारवाई न केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला आहे.