‘त्या’ उपोषणार्थींवर प्रतिबंधात्मक कारवाई

By Admin | Published: May 14, 2017 12:35 AM2017-05-14T00:35:52+5:302017-05-14T00:40:08+5:30

जालना : भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानासमोर उपोषणास बसलेल्या सहा जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना शनिवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

Prevention of 'those' subunits | ‘त्या’ उपोषणार्थींवर प्रतिबंधात्मक कारवाई

‘त्या’ उपोषणार्थींवर प्रतिबंधात्मक कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानासमोर उपोषणास बसलेल्या सहा जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना शनिवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आपल्या पदाचा राजीनाम देत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार हनुमंत पवार, मानस पगार, शरद पवार, अक्षय पुराणिक, मयूर लाटे, प्रविण जाधव यांनी केला आहे.
दरम्यान, लोकशाही मार्गाने उपोषण करीत असलेल्या तरुणांना जालन्यातील पोलीस ठाण्यात आणणे बेकायदेशिर आहे. पोलिसांच्या या कृत्याचा काँग्रेस पक्षातर्फे निषेध करतो आणि उपोषणार्थींना आमचा पाठिंबा असल्याचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.

Web Title: Prevention of 'those' subunits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.