रासायनिक खतांची भाववाढ, जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:02 AM2021-05-20T04:02:06+5:302021-05-20T04:02:06+5:30
निवेदनात म्हटले आहे की, भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. केंद्र सरकारने आता ...
निवेदनात म्हटले आहे की, भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. केंद्र सरकारने आता खतांच्या भाववाढीचा दुसरा धक्का दिला आहे. रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम सरकारने केले आहे. १०.२६.२६ ची किंमत ६०० रुपयांनी वाढली आहे.
डिएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. जे डीएपी खत ११८५ रुपयांना होते, ते आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०.२६.२६ ची पन्नास किलोची बॅग ११७५ रुपयांत होती, ती आता १७७५ रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशच्याही किमती वाढविल्या आहेत. या किमती कमी झाल्या पाहिजेत.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी सांगितले की, कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची भरमसाठ दरवाढ करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. देशभरातील शेतकरी या भाववाढीने बेजार होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात माजी आमदार सुभाष झांबड, सर्जेराव चव्हाण, भाऊसाहेब जगताप, विजय जाधव, राहुल सावंत आदींचा समावेश होता.