गुणंवत कामगार पाल्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:14 PM2019-03-19T23:14:38+5:302019-03-19T23:14:49+5:30
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या बजाजनगर कामगार कल्याण भवनतर्फे मंगळवारी कामगार कुटुंबियांच्या गुणवंत पाल्याचा गौरव करण्यात आला.
वाळूज महानगर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या बजाजनगर कामगार कल्याण भवनतर्फे मंगळवारी कामगार कुटुंबियांच्या गुणवंत पाल्याचा गौरव करण्यात आला.
कामगार कुटुंबांतील ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या गुणंवत पाल्यांना प्रोत्साहन म्हणून दरवर्षी कामगार कल्याण भवनतर्फे शिष्यवृत्ती व्यतिरिक्त विशेष ५ हजार रुपये देवून गौरव केला जातो. यंदाही इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत ९५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या प्रत्येकी ३ पाल्यांसह त्यांच्या पालकांचा व गुरुजींचा कामगार कल्याण मंडळाचे विभागीय सहाय्यक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व प्रत्येकी ५ हजार रुपयाचा धनादेश देवून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला एन.एस. वाठोरे, गुणवंत कामगार पी.एस. गुजर, शरद गुंड, शिरीष बक्षी, प्रदीप माळी, पांडुरंग मुरकुटे आदींसह कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन निरीक्षक दिनकर पाटील यांनी केले. तर सुष्मा पोटे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी संगीता पवार, ज्ञानेश्वरी ताले, निलिमा गावंडे, वनिता मसने, गीता पोहेवाले, गजानन पवार आदींनी परिश्रम घेतले.