औरंगाबादेत प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:26 AM2018-02-04T00:26:58+5:302018-02-04T00:27:05+5:30
राज्यात १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांसह सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या व इतर मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शनिवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्यात १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांसह सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या व इतर मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शनिवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
पूर्वी शिक्षकांसह अन्य कर्मचाºयांना जुनी पेन्शन व भविष्यनिर्वाह निधीची योजना सुरू आहे. मात्र, १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षक व कर्मचाºयांना नवीन परिभाषित अंशदान योजना लागू करण्यात आली. शासनाने नवीन पेन्शन योजनेच्या माध्यमातून शिक्षक व कर्मचाºयांवर अन्याय केला आहे. या अन्यायाच्या विरोधात प्राथमिक शिक्षक संघाने शनिवारी आंदोलनाचा निर्णय घेतला होता.
परिभाषित अंशदायी पेन्शन योजनेंतर्गत कपात करण्यात आलेल्या रकमेचा हिशेब देण्यात यावा, चट्टोपाध्याय वेतनश्रेणीबाबत जाचक शासन निर्णय रद्द करून पात्र शिक्षकांना वेतनश्रेणीचा तात्काळ लाभ देण्यात यावा, पात्र शिक्षकांना प्राथमिक पदवीधर, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्यात यावी, शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेलाच केले जावे, पुरवणी देयके निकाली काढण्यात यावी, भाषासूट आणि स्थायित्वाचा लाभ तात्काळ देण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी राज्य प्रसिद्धीप्रमुख राजेश हिवाळे, काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, जे. के. चव्हाण, हारुण शेख, प्रशांत हिवर्डे, प्रवीण पांडे, संजय भुमे, दिलीप साखळे, राजेश पवार, बळीराम भुमरे, संजय भडके, नारायण साळुंके, भास्कर चौधरी, राहुल पवार, ईश्वर पवार, बाबासाहेब जाधव, ज्ञानेश सरोते, अशोक डोळस, राजेंद्र महाजन, गया शिरवत, शकिला न्हावकर, मीनाक्षी राऊत, स्वाती भाले, रिता पाडळकर, शाहीन परवीन, महानंदा गुट्टे, राजश्री पाटील, अरुणा मेथे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे सचिन एखंडे, राजेंद्र गोर्डे, दीपक नरवडे, योगेश खरात व अन्य पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.