जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:34 AM2017-07-23T00:34:46+5:302017-07-23T00:36:26+5:30

आखाडा बाळापूर : विशेष पोलीस महानिरीक्षकाच्या आदेशाने नियुक्त लातूर पोलिसांच्या पथकाने बाळापूर येथील तीन जुगार अड्ड्यांवर धाड टाकली.

Print on gambling bases | जुगार अड्ड्यावर छापा

जुगार अड्ड्यावर छापा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : विशेष पोलीस महानिरीक्षकाच्या आदेशाने नियुक्त लातूर पोलिसांच्या पथकाने बाळापूर येथील तीन जुगार अड्ड्यांवर धाड टाकली. यात २८ जणांना अटक केली तर ६० हजार रोकड, जुगाराचे साहित्य, दोन संगणक संच जप्त केले आहेत. बसस्थानक परिसरातील दोन जुगार अड्ड्यावरील धाडीमुळे मोठा जमाव जमला होता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २२ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास ३ जुगार अड्ड्यावर तर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळील एका अड्ड्यावर धाड पडली. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्या आदेशानुसार लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील उपविभागीय अधिकारी श्रीधर पवार यांच्या नेतृत्वाखाली फौजदार पंडित सिरसे, प्रवीण उदे, पोलीस कर्मचारी माने, नरहरे, धाकपाडे, रेचवाडे, सय्यद, सय्यद पाटील, शेख, पाटील असे ११ जणांचे पथक साध्या वेशात आले. छाप्यामध्ये रोख ६० हजार रुपये, संगणकाचे दोन संच, जुगार साहित्य जप्त केले. तर जुगार अड्ड्यावरुन फुलाजी नेमाजी गुहाडे, पांडुरंग नारायण राऊत, मारोती गणपत शेळके, तुकाराम भुजंगराव धनवे, प्रल्हाद शेषेराव अंभोरे, देवीदास यादवजी थोरात, नामदेव नारायण फोपसे, अशोक उत्तमराव डुकरे, सदाशिव सोनबा कुंडे, गजानन बाबाराव आम्ले, नामदेव काशिबा मुकाडे, माधव मारोती शेळके, श्रीराम सखाराम महाुरे, माधव बापुजी डुकरे, गोमाजी तुकाराम डुकरे, मुक्ताजी विठ्ठल आवळे, शेख जावेद शेख जब्बार, जळबा विठ्ठल कणके, बाबाराव शंकर लाखाडे, राजेश माधवराव खिल्लारे, नरेंद्र सोनबा पतंगे, किशन अशोकराव नरवाडे, गजानन गणपती कांबळे, कैलास दिगंबर पुरी, राजू शंकर बेनगर, अनिल माधवराव पानपट्टे, देवराव मोतीराम नरवाडे, प्रकाश डुलाजी रणवीर अशा एकूण २८ जणांना अटक केली.

Web Title: Print on gambling bases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.