राज्यात वैद्यकीय शिक्षणाचे बजेट वाढविण्यास प्राधान्य - अमित देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 12:28 PM2021-02-15T12:28:02+5:302021-02-15T12:28:27+5:30
Amit Deshmukh शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) एमआरआय यंत्राचे लोकार्पण आणि कोविड योद्धा सत्कार समारंभ
औरंगाबाद : केंद्र सरकारने अर्थसंकल्पात आरोग्याचे बजेट वाढविले. राज्यातही आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणचे बजेट वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्रीअमित देशमुख म्हणाले.
औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) एमआरआय यंत्राचे लोकार्पण आणि कोविड योद्धा सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, खा. इम्तियाज जलील, आ. धीरज देशमुख, आ. आंबदास दानवे, आ. अतुल सावे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, डॉ. कल्याण काळे, प्रकाश मुगदिया, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. वर्षा रोटे आदींची उपस्थिती होती.
एमआरआय उपकरण रुग्णसेवेसाठी सज्ज
शिर्डी संस्थानने घाटी रुग्णालयास नव्या एमआरआय उपकरणासाठी मे २०१८ मध्ये १५ कोटींचा निधी दिला. या निधीच्या माध्यमातून घाटीतील क्ष-किरणशास्त्र विभागात अत्याधुनिक असे थ्री टेस्ला एमआरआय यंत्र दाखल झाले. चाचणी रुग्णांच्या तपासणीनंतर हे यंत्र रुग्णसेवेसाठी सज्ज झाले आहे.