तालुक्यातील समस्या सोडविण्यास प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:03 AM2021-07-11T04:03:51+5:302021-07-11T04:03:51+5:30
तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायत इमारत, गदाणा येथील दोन सिमेंट रस्ते, गल्ले बोरगाव, तीसगाव, वेरूळ, कसाबखेडा, खिर्डीतील सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन चव्हाण ...
तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायत इमारत, गदाणा येथील दोन सिमेंट रस्ते, गल्ले बोरगाव, तीसगाव, वेरूळ, कसाबखेडा, खिर्डीतील सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या सर्व कामांसाठी ७५ लाख व भेंडोळी मारुतीसाठी १५ लाख असा एकूण ९० लाखांचा निधी वितरित करण्यात आला. या कामांचे भूमिपूजन केल्यानंतर वेरूळ येथे पत्रकारांना माहिती देताना आ. चव्हाण म्हणाले की, वेरुळच्या शहाजीराजे भोसले स्मारक, खुलताबाद- म्हैसमाळ रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. यावेळी संतोष माने, माजी सभापती महेश उबाळे, तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण, आदिनाथ साळुंके, खिर्डीचे सरपंच ज्ञानेश्वर मातकर, सरपंच ज्ञानेश्वर दुधारे, जावेद पटेल, दिनेश सावजी, हर्षल पाटील, सुधाकर गवळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
--- फोटो : गल्ले बोरगावातील विकासकामांचे भूमिपूजन करताना सतीश चव्हाण. समवेत इतर.
--------------------------------------------------
मावसाळा येथील शिवरस्ता आ. बंब यांनी स्वखर्चाने दिला पूर्ण करून
मावसाळा येथील शिवरस्ता आ. प्रशांत बंब यांनी पूर्ण करून दिला असून, त्याची पाहणीही त्यांनी केली. स्थानिक शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आमदार बंब यांनी तीन लाखांचा निधी रस्त्यासाठी उपलब्ध करून दिला होता. विविध विकासकामांसंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश वाकळे, सभापती गणेश आधाने, उपसभापती युवराज ठेंगडे, सदस्य प्रकाश चव्हाण, प्रभाकर शिंदे, सरपंच राजेश्री देवगिरीकर, प्रभाकर घाटे, मीना घाटे, प्रगती गवळी, गंगाबाई काळे आदी उपस्थित हाेेते.