जीएसटीच्या अंमलबजावणीतील चुकीमुळे देश आर्थिक संकटात - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 08:48 PM2017-10-13T20:48:31+5:302017-10-13T20:50:12+5:30

वस्तू व सेवाकर (जीएसटी) ही ऐतिहासिक नवीन करप्रणाली आहे. करप्रणाली चांगली आहे पण केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने केली आहे. परिणामी, संपूर्ण देशात आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

Prithviraj Chavan in the financial crisis due to GST execution | जीएसटीच्या अंमलबजावणीतील चुकीमुळे देश आर्थिक संकटात - पृथ्वीराज चव्हाण

जीएसटीच्या अंमलबजावणीतील चुकीमुळे देश आर्थिक संकटात - पृथ्वीराज चव्हाण

googlenewsNext
ठळक मुद्देजीएसटी ही ऐतिहासिक नवीन करप्रणालीअंमलबजावणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने अमेरिकी बँकांनी मोदींना गंडावले

औरंगाबाद : वस्तू व सेवाकर (जीएसटी) ही ऐतिहासिक नवीन करप्रणाली आहे. करप्रणाली चांगली आहे पण केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने केली आहे. परिणामी, संपूर्ण देशात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. सरकार हट्टी असल्याने ते विरोधी पक्षांनी सुचविलेले सुधारणा मान्यास तयार नाही. भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी आता जनतेने एकत्र येऊन सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे स्पष्ट विचार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे मांडले.
भारतीय अर्थव्यवस्था, भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ या विषयांवरील गुरुवारी सायंकाळी आयोजित व्याख्यानात त्यांनी उद्योजक, व्यापारी, सीए, करसल्लागार यांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानाचे आयोजन जिल्हा व्यापारी महासंघ, सीए संघटना व कर सल्लागार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. जीएसटीमुळे उद्योग, व्यवसायात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवरील भाष्य करणा-या व भविष्यातील अर्थव्यवस्थेचे वेध घेणा-या हे व्याख्यान ऐकण्यासाठी तापडिया नाट्यमंदिर हाऊसफुल झाले होते. चव्हाण पुढे म्हणाले की, जीएसटीच्या अमलबजावणीसाठी दोन ते तीन महिन्याचा अवधी वाढवून देणे आवश्यक होते. २००३ ते २०१० पर्यंत अर्थिक विकास सुवर्णकाळ मानला जातो. या कालावधीत जीडीपी ९ टक्कांपर्यंत जाऊन पोहोचला. मागील तीन वर्षात जीडीपीदर वेगाने खाली उतरला आहे. यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत अवघ्या ५.७ टक्केवर पोहोचला आहे. सरकार जीडीपीदर फुगवून सांगत आहे. मुळात ३.५ टक्क्यांपर्यंत जीडीपीदर खाली येऊन ठेपला आहे. जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीचा फटका संपूर्ण देशवासीयांना भोगावा लागत आहे.
अर्थव्यवस्थेत सुधारणा येण्यासाठी आणखी दोन तिमाही लागणार आहे. जीएसटीचा घाईत निर्णय घेण्यात आला. सरकारी अधिका-यांना त्याविषयी अधिक माहिती नाही, सॉफ्टवेअर सिस्टीम सक्षम नाही, असेही त्यांनी विविध उदाहरण देऊन देशाची अर्थव्यवस्थेची सत्यपरिस्थिती समोर मांडली. प्रास्ताविकात, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा म्हणाले की, जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीचा ताण उद्योग-व्यापा-यांवर आला आहे. व्यवसायिकांची मर्यादा लक्षात घेण्यात येत नाही. अंतर्गत व्यापार धोरण राबवा व व्यापाºयांना नफा नको करवसूलीतील कमिशन द्या, अशी मागणी त्यांनी केली. प्रमुख पाहूण्यांचा परिचय सीए संघटनेचे अध्यक्ष अल्केश रावक यांनी केले. यावेळी आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे, महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार, राम भोगले आदीं उद्योजक,व्यापारी,सीएची उपस्थिती होती.

अमेरिकी बँकांनी मोदींना गंडावले
नोटाबंदीच्या विषयावर पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केला की, नोटाबंदीचा निर्णय अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आला. अमेरिकी बहुराष्ट्रीय बँकांनी क्रेडीट कार्ड खपविण्यासाठी नोटाबंदी अंमलात आणण्याचा चुकीचा सल्ला देऊन मोदींना गंडावले. क्रेडीट कार्डच्या व्यवहारावरील कमिशन नियंत्रणात आणण्याचा सल्लाही चव्हाण यांनी दिला.

Web Title: Prithviraj Chavan in the financial crisis due to GST execution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.