महालक्ष्मी आरास सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
By Admin | Published: September 13, 2014 10:57 PM2014-09-13T22:57:39+5:302014-09-13T23:04:09+5:30
हिंगोली : ‘लोकमत’ सखीमंचतर्फे घेण्यात आलेल्या महालक्ष्मी आरास सजावट स्पर्धेचे शनिवारी बक्षीस वितरण करण्यात आले.
हिंगोली : ‘लोकमत’ सखीमंचतर्फे घेण्यात आलेल्या महालक्ष्मी आरास सजावट स्पर्धेचे शनिवारी बक्षीस वितरण करण्यात आले.
बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून बुलडाणा अर्बन बँकेचे विभागीय व्यवस्थापक संतोष टाले, ‘मानस राखी’चे अमित रूहटिया, क्रिश्ना रूहटिया यांची उपस्थिती होती. १ ते ३ सप्टेंबर या कालावधीत स्पर्धेची नावनोंदणी करण्यात आली.
४ सप्टेंबर रोजी स्पर्धेत सहभागी सदस्यांच्या घरी जाऊन महालक्ष्मींचे फोटो काढण्यात आले.
यामध्ये महालक्ष्मीचा साज, राशी, मखर, पडदे, सजावटीसाठी वापरण्यात आलेले साहित्य, रांगोळी, दिवे आदीच्या सुटसुटीत आणि व्यवस्थित मांडणीला महत्व देण्यात आले. त्याद्वारे विजेत्यांची निवड करण्यात आली. हिंगोली महालक्ष्मी आरास सजावटीत विजेत्या ठरलेल्या सदस्यांमध्ये नंदा नंदकिशोर रामेश्वरे, श्रद्धा राम पातूरकर, पुष्पा सुरेश मुंदडा, साधना विजय घ्यार, गंगासागर सुधाकर बल्लाळ यांचा समावेश आहे.
वसमत : येथील स्पर्धेत मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला. त्यामध्ये रेखा रूद्रवार, डॉ. दीपाली अग्रवाल, प्रतिभा आल्लमखाने, रूपाली दलाल, जयश्री कळणे यांनी बाजी मारली. या विजेत्यांना संजय पवार, सनीता पवार यांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
हिंगोली येथील स्पर्धेचे मानस राखी आणि वसमत येथील स्पर्धेचे वैष्णवी लेडीज कलेक्शन अॅण्ड गिफ्ट सेंटर यांनी प्रायोजकत्व स्वीकारले होते. (वाणिज्य प्रतिनिधी)