दाद-याचा प्रश्न परभणीत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:07 AM2017-09-30T00:07:28+5:302017-09-30T00:07:28+5:30

परभणी येथील रेल्वेस्थानकावर बसविलेला दादरा अरुंद असून प्रवाशांची संख्या वाढत असताना प्रशासन पर्यायी व्यवस्था करीत नसल्याने हा प्रश्न अधिकच जटील होत आहे.

The problem of herpes is in Parbhani | दाद-याचा प्रश्न परभणीत कायम

दाद-याचा प्रश्न परभणीत कायम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी येथील रेल्वेस्थानकावर बसविलेला दादरा अरुंद असून प्रवाशांची संख्या वाढत असताना प्रशासन पर्यायी व्यवस्था करीत नसल्याने हा प्रश्न अधिकच जटील होत आहे.
शुक्रवारी मुंबई येथे फ्लायओव्हरवर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर परभणी रेल्वेस्थानकावरील दादºयाच प्रश्न प्रकर्षाने समोर आला आहे. परभणी रेल्वे स्थानकावर प्लॅट फॉर्म २ व ३ वर जाण्यासाठी दोन दादरे बसविले आहेत. त्यातील एका दादºयाचे काम अर्धवट आहे. त्यामुळे प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दादºयाचाच वापर होतो. परभणी रेल्वेस्थानकासाठी स्लायडिंग स्टेप्स् मंजूर झाल्या आहेत. परंतु, यासाठी आलेले साहित्यही परत नेण्यात आले. त्यामुळे हा प्रश्न जैसे थे आहे. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर दादºयाचा प्रश्न अधिकच उद्भवत आहे. नांदेडहून मुंबईकडे जाणाºया एक्सप्रेस आणि पॅसेंजर अशा सर्व गाड्या प्लॅट फॉर्म क्रमांक २ व ३ वर लावल्या जात आहेत. परभणी रेल्वे स्थानकावरुन नांदेडच्या तुलनेत औरंगाबाद, मुंबईकडे जाणाºया प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे एकाच अरुंद दादºयावर मोठ्या प्रमाणावर भार येत असून दुर्घटना घडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. मुंबई येथील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने परभणी येथील दादरा, सरकत्या जिन्यांचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: The problem of herpes is in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.