विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांचा घोळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 06:44 PM2020-10-09T18:44:37+5:302020-10-09T18:45:12+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाल्या. मात्र पहिल्याच दिवशी ऑनलाईन परीक्षेत चांगलाच घोळ झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाल्या. मात्र पहिल्याच दिवशी ऑनलाईन परीक्षेत चांगलाच घोळ झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पहिल्यांदाच विद्यापीठाच्या परीक्षांसाठी ऑनलाईन पर्यायाचा प्रयोग करण्यात आला होता. त्यामुळे पहिलाच प्रयोग कितपत यशस्वी होणार, याबाबत प्रत्येकालाच उत्सूकता होती. परंतु परीक्षांचा प्रयोग अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाला नसल्याचे विद्यार्थी म्हणाले.
४ जिल्ह्यांतील १ लाख ६४ हजार विद्यार्थी या परीक्षांना बसलेले असून दि. ९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ही परीक्षा होत आहे. यापैकी १ लाख १४ हजार विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने तर ५० हजार विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहेत.
पहिल्या दिवशी संगणकशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स शाखेचा पेपर देण्यात आला तर सकाळच्या सत्रात लिंक ओपन न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची काही काळासाठी चांगलीच तारांबळ उडाली. यापुढचे पेपर तरी सुरळीत पार पडावेत, अशी अपेक्षा विद्यार्थी आणि पालकांकडून व्यक्त होत आहे.