रेल्वे प्रकल्पासाठी थेट जमीन खरेदीस अडचण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:45 AM2017-08-22T00:45:32+5:302017-08-22T00:45:32+5:30
संगणकीकृत सातबारावरील त्रुटी आणि चुकांमुळे रेल्वे प्रकल्पासाठी थेट जमिनी खरेदी करण्याच्या कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
विलास भोसले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : संगणकीकृत सातबारावरील त्रुटी आणि चुकांमुळे रेल्वे प्रकल्पासाठी थेट जमिनी खरेदी करण्याच्या कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्रुटींचा फटका थेट शेतकºयांना बसत असून रेल्वे प्रकल्पाच्या कामावरही याचा परीणाम होत आहे. महसूल विभागाने संगणकीकृत सातबाराची माहिती भरताना झालेल्या चुकांची दुरूस्ती करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम ठरवलेला आहे. सातबारा नादुरूस्त असल्याने रेल्वेमार्गासाठी थेट जमीन खरेदी कामातही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. याचा भूर्दंड शेतकºयांना सहन करावा लागत आहे.
नगर-बीड-परळी हा नवीन रेल्वेमार्ग पाटोदा तालुक्याजवळून जातो आहे. तालुक्यातील अंमळनेरहून सुमारे १५ ते २० कि़मी.एवढाच रेल्वेमार्ग तालुक्यामधून होत आहे. या कामासाठी महसूल प्रशासनाने शेतकºयांच्या खाजगी जमिनी अधिग्रहीत केलेल्या आहेत. मार्गावरील लहान-मोठे पुल आणि मुरूम भराव, सपाटीकरण अशी कामे झालेली आहेत. असे असले तरी नवीन शासकीय धोरणानुसार खाजगी शेतकºयांच्या शेतजमिनी रेल्वेला थेट खरेदी करावयाच्या आहेत.