पॉस मशीनद्वारे खत विक्रीला अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:03 AM2017-09-01T01:03:11+5:302017-09-01T01:03:11+5:30

ग्रामीण भागात रेंज मिळत नसल्याने मशीनऐवजी नियमित पद्धतीने खत विक्री सुरू आहे.

 Problems in the sale of manure by a posing machine | पॉस मशीनद्वारे खत विक्रीला अडचणी

पॉस मशीनद्वारे खत विक्रीला अडचणी

googlenewsNext

बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मंजूर खताचे योग्य पद्धतीने वितरण करण्यासाठी ई-पॉस मशीनद्वारे खत वाटपाचे कृषी विभागाचे नियोजन होते. त्यानुसार कृषिसेवा केंद्रचालकांना जिल्हा परिषद कृषी विभागाला प्राप्त ६३१ यंत्राचे वाटप करण्यात आले. मात्र, ग्रामीण भागात रेंज मिळत नसल्याने मशीनऐवजी नियमित पद्धतीने खत विक्री सुरू आहे.
खरीप हंगामासाठी जालना जिल्ह्याला १६१८०० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर असून, आतापर्यंत मोठ्या प्रमाणात खत उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात येणाºया खताचा काही व्यापाºयांकडून होणारा काळा बाजार रोखला जावा, त्याच भागातील शेतकºयांना खताची विक्री व्हावी, खत विक्रीच्या नोंदी योग्य पद्धतीने ठेवता याव्यात यासाठी यंदाच्या खरिपात कृषिसेवा केंद्रातून ई-पॉस मशीनद्वारे खते विक्री करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले होते. खरीप हंगामाच्या सुरुवातीला विभागाला हे यंत्र उपलब्ध झाले नाहीत. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यात ६३१ ई-पॉस यंत्र उपलब्ध झाल्यानंतर त्यांचे तालुकानिहाय वाटप करण्यात आल्या.
त्यानंतर कृषिकेंद्र चालकांना ई-पॉस मशीनद्वारे खत वाटपाचे प्रशिक्षणही देण्यात आले. सुरुवातीला काही विके्रत्यांनी मशीनद्वारे खत वाटपाला सुरुवात केली. मात्र, ग्रामीण भागात शेतकºयांचा आधारकार्ड क्रमांक टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन व इतर माहिती प्राप्त करण्यासाठी मशीनला आवश्यक रेंज मिळत नाही. शिवाय अन्य तांत्रिक अडचणींमुळे ई-पॉसद्वारे खत विक्रीला अडचणी येत आहेत. त्यामुळे बहुतांश कृषिकेंद्र चालक जुन्या पद्धतीनेच खतांची विक्री करताना दिसत आहे. नवीन मोंढ्यातील अनेक कृषिकेंद्रावर थेट खत विक्री सुरू आहे.

Web Title:  Problems in the sale of manure by a posing machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.