कच-यावर प्रक्रिया; कंपन्या सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:51 AM2017-10-24T00:51:18+5:302017-10-24T00:51:18+5:30

इंग्लंड येथील न्यू सेंटर एनर्जी या कंपनीने कच-यापासून वीजनिर्मिती करण्याची तयारी दर्शवली

Process on the trash; Companies initiative | कच-यावर प्रक्रिया; कंपन्या सरसावल्या

कच-यावर प्रक्रिया; कंपन्या सरसावल्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नारेगाव येथील शेतक-यांनी आंदोलन केल्यानंतर महापालिका प्रशासनाने कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. आतापर्यंत दोन कंपन्यांनी मनपाकडे कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी सादरीकरण केले. आता इंग्लंड येथील न्यू सेंटर एनर्जी या कंपनीने कच-यापासून वीजनिर्मिती करण्याची तयारी दर्शवली असून, शहरात हा प्रकल्प उभारण्यास इच्छुक असल्याचे कळविले आहे. आयुक्तांनी तातडीने या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यासाठी ३०, ३१ आॅक्टोबर आणि २ नोव्हेंबर रोजी वेळ देण्याची तयारी दर्शवली आहे.
नारेगाव येथील शेतक-यांनी मनपाला कच-यावर प्रक्रिया करणे, नवीन कचरा नारेगावात आणून न टाकण्यासाठी फक्त ९० दिवसांची मुभा दिली आहे. या कालावधीत मनपाने ठोस पाऊल न उचलल्यास शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. मनपाने कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्याची तयारी सुरू केली आहे. चीनच्या कंपनीने अलीकडेच सादरीकरण केले. त्यानंतर इंग्लंडमधील कंपनीने वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्यास इच्छुक असल्याचे मनपा प्रशासनाला कळवले असून, तसा प्रस्ताव आयुक्तांना प्राप्त झाला आहे. या कंपनीचा एक प्रकल्प जर्मनीमध्ये उभारण्यात आला असून, देशात दोन शहरांमध्ये हा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. दररोज ५०० मेट्रिक टन कचºयापासून ३० ते ७० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाईल. यासाठी मनपाला कोणताही खर्च लागणार नाही. प्रकल्प उभारण्यासाठी जागा द्यावी लागेल. कंपनी प्रकल्प उभारण्याचा खर्च स्वत: करणार असून, तयार होणारी वीज सरकारला विकण्यात येईल, असा हा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. कंपनीने प्रकल्पाचे सादरीकरण करण्यासाठी वेळ मागितला असून, आयुक्तांनी ३०, ३१ आॅक्टोबर किंवा २ नोव्हेंबर या दिवशी कंपनीचे अधिकारी प्रकल्पाचे सादरीकरण करू शकतील, असे कळवले आहे. कंपनीच्या प्रकल्पाचे सादरीकरण झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.

Web Title: Process on the trash; Companies initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.