औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप हंगामाचे उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:20 AM2018-09-01T00:20:50+5:302018-09-01T00:21:48+5:30

जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यात पाऊस झाला असला तरी त्याचा खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार नाही. ५० टक्क्यांपेक्षा जास्त खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा प्रशासनाने पिकांच्या बाबतीत आढावा घेण्याच्या सूचना प्रशासकीय पातळीवर केल्या असून, पुढील महिन्यात आणेवारीबाबत निर्णय होणे शक्य आहे.

Production of kharif crops in Aurangabad district | औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप हंगामाचे उत्पादन घटणार

औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप हंगामाचे उत्पादन घटणार

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांची चिंता कायम : कापूस, मका, सोयाबीनच्या पिकांवर होणार परिणाम; पुढील महिन्यात आणेवारी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यात पाऊस झाला असला तरी त्याचा खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार नाही. ५० टक्क्यांपेक्षा जास्त खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा प्रशासनाने पिकांच्या बाबतीत आढावा घेण्याच्या सूचना प्रशासकीय पातळीवर केल्या असून, पुढील महिन्यात आणेवारीबाबत निर्णय होणे शक्य आहे.
जिल्ह्यात आजवर ५० टक्के पाऊस झाला आहे. १५ आॅगस्टनंतर झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी उत्पादन घटणार आहे. पावसाच्या तुलनेत पैठण, सिल्लोड, गंगापूर, खुलताबाद तालुके ५० टक्क्यांच्या आतच आहेत. ६७५ मि.मी. जिल्ह्याची पावसाची सरासरी असून, आजवर ३३८ मि.मी. पाऊस झाला आहे. ४६६ मि.मी. इतका पाऊस होणे अपेक्षित होते. ११७ मि.मी. इतका पावसाचा खंड आहे. त्यामुळे मुबलक पावसाअभावी जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात पाऊस होऊनही पिकांवरील संकट कायम आहे. त्या तालुक्यात कापूस व मका पिकांचे साधारणत: ५० टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. पैठण, फुलंब्री, गंगापूर तालुक्यांतही अशीच परिस्थिती आहे. सिल्लोड तालुक्यात खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादकतेत ३० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता आहे. खुलताबाद, कन्नड, सोयगाव तालुक्यांत पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र त्याचा फारसा फायदा होईल, अशी शक्यता नाही. जालना जिल्ह्यातील पिकांनी माना टाकल्या होत्या; परंतु आॅगस्टमधील पावसामुळे पिके तरली आहेत.
पिकांची सद्य:स्थिती अशी...
जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यात मक ा, कापूस पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. पैठण तालुक्यातील मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस पिकांचे उत्पादन घटणे शक्य आहे. गंगापूर तालुक्यात पिकांची परिस्थिती बिकट आहे. सिल्लोड तालुक्यातील या हंगामातील पिकांचे उत्पादन घटणार आहे.
कन्नड, सोयगाव, खुलताबाद तालुक्यांत फारशी चांगली परिस्थिती नाही. काही ठिकाणी मक्यावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसतो आहे. कापसावर कीड पडली आहे. जालना व इतर जिल्ह्यांत कापसाच्या पिकावर बोंडअळी दिसून येत आहे. तुरीच्या पानांवर अळ्यांचा प्रभाव दिसतो आहे.

Web Title: Production of kharif crops in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.