फुलंब्रीत १ लाख लाडू तयार करण्यास सुरुवात; रामभक्त तालुक्यातील प्रत्येक गावात वाटणार प्रसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 07:21 PM2024-01-20T19:21:10+5:302024-01-20T19:21:27+5:30
आमदार हरिभाऊ बागडे यांनी स्वतः तयार केले लाडू
फुलंब्री: श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने तालुक्यातील प्रत्येक गावात लाडूंचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. यासाठी शहरात १ लाख लाडू तयार करण्याचे काम आज सुरु झाले. आमदार हरिभाऊ बागडे यानी या ठिकाणी भेट देऊन लाडू तयार करण्यास हातभार लावला.
अयोध्यामध्ये २२ जानेवारीला होत असलेल्या श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून फुलंब्री शहारासह तालुक्यात २१ व २२ जानेवारीला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात २१ जानेवारीला शहरातील राम मंदिरात कान्यापूजन ,२२ जानेवारीला शोभायात्रा ,प्राणप्रतिष्ठा सोहळा दर्शन व कीर्तन ,आरती व महाप्रसाद,दीपोत्सव व महाआरती आदीचा समावेश आहे. फुलंब्री शहरातील राम मंदिरा वर सजावट करण्यात आली असून रोशनाई करण्यात आलेली आहे २२ जानेवारी रिजी दिवसभर विविध कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे.
तालुकाभर वाटणार एक लाख लाडू
२२ जानेवारीला होत असलेल्या राम लाल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित तालुक्यातील राम भक्त मध्ये उत्साह आहे. रामभक्तांच्यावतीने फुलंब्री शहरात लाडू तयार केले जात असून याची सुरुवात शनिवारी करण्यात आली. दोन दिवसात १ लाख लाडू तयार करून २२ जानेवारीला ते प्रत्येक गावात प्रसाद म्हणून वाटप केले जाणार आहेत. आमदार हरिभाऊ बागडे यांनी देखील या ठिकाणी भेट देऊन आपल्या हाताने लाडू तयार केले. त्यांच्या सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाट,सभापती अनुराधा चव्हाण, शहराध्यक्ष योगेश मिसाळ , बाबासाहेब शिनगारे ,विकास गायकवाड ,सर्जेराव मेटेसह अनेक कार्यकर्ते होते.