प्रा. लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज स्वीकारण्याची संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता प्रा.डॉ. शिवानंद भानुसे यांची तयारी
By बापू सोळुंके | Published: July 1, 2024 10:08 PM2024-07-01T22:08:27+5:302024-07-01T22:08:48+5:30
डॉ. भानुसे म्हणाले की, प्रा. लक्ष्मण हाके हे फार मोठे अभ्यासक, विचारवंत असल्याचे भासवत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रा. लक्ष्मण हाके हे विविध चॅनेलवर मुलाखती देताना ते मनोज जरांगे-पाटील यांचे सल्लागार, समर्थक आणि आरक्षणाचे अभ्यासक यांनी मराठा आरक्षण विषयावर लाईव्ह चर्चा करावी असे ओपन चॅलेंज देत आहेत, त्यांचे हे चॅलेंज स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता प्रा.डॉ. शिवानंद भानुसे यांनी मंगळवारी 'लोकमत'ला सांगितले.
डॉ. भानुसे म्हणाले की, प्रा. लक्ष्मण हाके हे फार मोठे अभ्यासक, विचारवंत असल्याचे भासवत आहेत. ते जनतेला खोटी व चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. त्यामुळे मी संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता या नात्याने तसेच संविधानाचा आणि आरक्षणाचा अभ्यासक म्हणून त्यांचे हे चर्चेचे आव्हान स्वीकारत आहे. त्यांनी केव्हाही, कुठेही, कुठल्याही चॅनेलवर किंवा इतर ठिकाणी, आपल्यासोबत मराठा आरक्षण या विषयावर लाईव्ह चर्चा करावी. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, असेही प्रा. भानुसे म्हणाले.