सोशल मीडियावर उमेदवाराचा प्रचार केल्याने पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 06:24 PM2019-04-22T18:24:46+5:302019-04-22T18:25:51+5:30

आठ दिवसांपासून व्हॉटस्अ‍ॅपवर संदेश टाकून केला प्रचार

The promotion of a candidate on social media has led to the crime against the police | सोशल मीडियावर उमेदवाराचा प्रचार केल्याने पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल

सोशल मीडियावर उमेदवाराचा प्रचार केल्याने पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

बनोटी (औरंगाबाद ) : जिल्ह्यातील सोयगाव पोलीस ठाण्याच्या एका कर्मचाऱ्याने औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील एका उमेदवाराचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार केल्याचे उघडकीस आल्याने त्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध सोयगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला. योगेश झाल्टे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तातडीने या पोलीस कर्मचाऱ्याची औरंगाबाद येथील पोलीस नियंत्रण कक्षात बदली करून चौकशी सुरू केली आहे.

झाल्टे यांची नेमणूक बनोटी पोलीस चौकीवर पोलीस नाईक म्हणून आहे. ते गेल्या आठ दिवसांपासून व्हॉटस्अ‍ॅपवर संदेश टाकून परिचयाच्या लोकांना याच उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करत होते. सदर संदेश हा कन्नड विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराच्या प्रचाराशी निगडीत आहे.

हा प्रकार सोयगाव तालुका शिवसेना प्रमुख  दिलीप मचे यांच्या लक्षात आला. त्यांनी लगेच ही माहिती निवडणूक विभागाला दिली. निवडणूक विभागाच्या चौकशीत सत्यता आढळल्याने दिलीप मचे यांनी लगेच निवडणूक विभागासह सोयगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी झाल्टे यांच्याविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल केला. सदर कारवाईचा अहवाल औरंगाबाद व जालना येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना सादर करण्यात आला आहे. 

Web Title: The promotion of a candidate on social media has led to the crime against the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.