प्रचार तोफांचा आवाज बंद, प्रशासन अलर्ट; कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 02:34 PM2024-11-19T14:34:33+5:302024-11-19T14:34:49+5:30

वैजापूर वगळता जिल्ह्यात सर्वत्र २ बॅलेट युनिट लागणार आहेत.

Propaganda cannons off, administration alert; Employees leave for polling stations | प्रचार तोफांचा आवाज बंद, प्रशासन अलर्ट; कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना

प्रचार तोफांचा आवाज बंद, प्रशासन अलर्ट; कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी ६ वा. थांबली. प्रचार तोफांचा आवाज बंद झाल्यानंतर आता पुढील ४८ तास प्रशासन अलर्ट मोडवर राहणार आहे. आज दुपारी मतदान केंद्रांकडे पूर्ण यंत्रणा रवाना झाली आहे. मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिल्ह्यात भरारी पथकांच्या गस्ती वाढविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

विधानसभा निवडणुकीसाठी ३९७ उमेदवारांनी अर्ज भरले होते. २१४ जणांनी माघार घेतली. १८३ उमेदवारांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल. २३ रोजी मतमोजणी होईल. वैजापूर वगळता जिल्ह्यात सर्वत्र २ बॅलेट युनिट लागणार आहेत. १९ रोजी सकाळच्या सत्रात यंत्रणेचे प्रशिक्षण झाल्यावर दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत सर्व कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना होतील. ४८ तासांत सोशल मीडियातील प्रचारावर पूर्णत: नजर असणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला पोलिस आयुक्त प्रवीण पवार, जि.प.सीईओ विकास मीना, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके आदींची उपस्थिती होती.

ईव्हीएम किती लागणार
७४३० : बॅलेट युनिट
३९१७ : कंट्रोल युनिट
४३४३ : व्हीव्हीपॅट

जिल्ह्यात ३२७३ मतदान केंद्र
शहरात : १२९०
ग्रामीण भागात : १९८३
शहरी मतदान केंद्र : ४२३
ग्रामीण मतदान केंद्र : १२२९
पोलिस आयुक्तालय हद्दीतील केंद्र : १२६१
पोलिस अधीक्षक हद्दीतील केंद्र : २०१२
संवेदनशील केंद्र : ४०

एकूण मतदार : ३२ लाख २७ हजार ५१
पुरुष मतदार : १६ लाख ६३ हजार १८३
महिला मतदार : १५ लाख ३९ हजार ४२१
दिव्यांग मतदार : २७ हजार ९६४
सेवा मतदार : २ हजार ५०८

वाहनांची व्यवस्था
किती वाहने लागणार : १५९६
एस.टी. बसेस किती : ३७४
ऑटोरिक्षा : १५०

कर्मचारी किती लागणार
पुरुष कर्मचारी : १० हजार ७९८
महिला कर्मचारी : ७२००
एकूण : १८ हजार १७८

शहरातील पोलिस यंत्रणा किती
पोलिस कर्मचारी : १८२३ / १२३ अधिकारी
२६९३ : सीआरपीएफ कर्मचारी
ग्रामीण पोलिस यंत्रणा किती
पोलिस कर्मचारी : २२९१/ १३७ अधिकारी

गृहमतदान किती झाले?
एकूण मतदान : ४७१४
झालेले मतदान : ४ हजार ७१ (७९ टक्के)
पोस्टल मतदान किती झाले
एकूण मतदान : १३ हजार ३४१
झालेले मतदान : ९६९९ (७३ टक्के)
सैन्यदल मतदान : २२०८
झालेले मतदान : १०
आरोग्य यंत्रणेची व्यवस्था
एकूण कर्मचारी : ३१०३
मेडिकल ऑफिसर : ३७१

दिव्यांगांसाठी काय तयारी
१५१० केंद्रांवर व्हीलचेअर

पोलिस अधीक्षकांच्या हद्दीतील यंत्रणा अशी
मतदारसंघ : ६
मतदान केंद्र : १२४४
पोलिस अंमलदार : २१४०
होमगार्ड : १५००
संवेदनशील केंद्र : २७

Web Title: Propaganda cannons off, administration alert; Employees leave for polling stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.