साता-यात मालमत्ता कराविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:19 AM2017-10-23T01:19:39+5:302017-10-23T01:19:39+5:30
देवळाई- सातारा परिसरात पाऊणलाखापेक्षा जास्त लोकसंख्या असून, येथील हजारो मालमत्ताधारकांच्या सदनिकेला मनपाचा कर लागलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : देवळाई- सातारा परिसरात पाऊणलाखापेक्षा जास्त लोकसंख्या असून, येथील हजारो मालमत्ताधारकांच्या सदनिकेला मनपाचा कर लागलेला नाही. वॉर्ड कार्यालय व खाजगी एजन्सीला दिलेल्या कामातही तफावत असून, कामातील दिरंगाईने मनपाचा महसूल बुडत आहे.
सातारा- देवळाई दोन्ही गावे व परिसर ग्रामपंचायतीतून नगर परिषद आणि मनपात समाविष्ट झाले आहेत. मात्र, ग्रामपंचायतीच्या काळातील शेकडो मालमत्तांना कर लावण्यात आलेला नव्हता.
मालमत्ताही एका रेषेत नव्हत्या. त्यामुळे घराची नोंदणी घेऊन त्यांना नवीन पद्धतीने कर लावण्याचे काम शिबीर घेऊन दिवाळीपूर्वी करण्यात आले; परंतु अद्यापही बहुतांश मालमत्तांची नोंदणीच मनपाच्या दफ्तरी नसल्याने महसूल बुडीत खात्यात मानला जात आहे. या भागातील राहणाºया नागरिकांची मानसिकता कर भरण्याची असतानाही त्यांना सविस्तर माहिती देण्याचे टाळले जात आहे. त्यांचे योग्य समुपदेशन करण्यासाठी देखील कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे नागरिकांनाही त्याकडे फारसा रस राहिलेला दिसत
नाही.
महसूलच जमा होत नसल्याने मनपाने खर्च करावाच कसा, असा सवाल मनपाच्या अधिकाºयांपुढे उपस्थित असला तरी दोन वर्षांत सातारा- देवळाईत एकही योजना कार्यान्वित करण्यात आलेली नाही. १०० कोटींच्या निधीतून सातारा-देवळाईच्या तोंडाला पाने पुसण्यात आली असून, काही रस्त्यांवर राजकीय आखाडे भरविण्याचा प्रताप सुरू
आहे.