आयकर विभागातर्फे मालमत्तेचे लिलाव

By Admin | Published: May 3, 2017 12:18 AM2017-05-03T00:18:55+5:302017-05-03T00:24:44+5:30

औरंगाबाद : मागील ५ ते ६ वर्षांपासून आयकराची थकबाकी न भरणाऱ्या जालन्यातील एका व्यापाऱ्याचे दुकान व गोदामाचा लिलाव मंगळवारी आयकर विभागाने केला

Property Auction by Income Tax Department | आयकर विभागातर्फे मालमत्तेचे लिलाव

आयकर विभागातर्फे मालमत्तेचे लिलाव

googlenewsNext

औरंगाबाद : मागील ५ ते ६ वर्षांपासून आयकराची थकबाकी न भरणाऱ्या जालन्यातील एका व्यापाऱ्याचे दुकान व गोदामाचा लिलाव मंगळवारी आयकर विभागाने केला. या लिलावाची बोली ४१ लाखांपर्यंत जाऊन पोहोचली, अशा प्रकारे आयकर विभागाद्वारे थकबाकीदारांच्या संपत्तीचा लिलाव करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
विभागाने सर्वप्रथम मागील ५ ते ६ वर्षांत ज्यांनी आयकर भरला नाही ज्यांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे अशांची यादी तयार केली. त्यांना नोटिसा पाठविल्या व नोटिसांना ज्यांनी उत्तर दिले नाही त्यांच्यावर थेट कारवाई करण्यासाठी योजना आखली. या अंतर्गत मंगळवारी जालना येथील प्रकाश कटारिया या व्यापाऱ्याची संपत्ती लिलाव करण्यात आली. या व्यापाऱ्याकडे सुमारे ९ कोटी रुपयांची आयकर थकबाकी आहे. मार्च २०१७ मध्ये कटारिया यांची स्थावर मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली होती. यात दुकान व गोदामाचा समावेश होता.
आज या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला. लिलावाची कारवाई प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव व अप्पर आयुक्त संदीपकुमार सोळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. लिलावाची प्रक्रिया करवसुली अधिकारी अनिमेष नाशकर आणि उपायुक्त रवींद्र चव्हाण यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)

Web Title: Property Auction by Income Tax Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.