मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी अतिरिक्त केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:05 AM2021-07-15T04:05:11+5:302021-07-15T04:05:11+5:30
औरंगाबाद : मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयातच जावे लागत होते. नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक झोनमध्ये अतिरिक्त कर ...
औरंगाबाद : मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयातच जावे लागत होते. नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक झोनमध्ये अतिरिक्त कर भरणा केंद्र सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या केंद्रांवर नागरिकांना मालमत्ता कर, तसेच पाणीपट्टी भरता येईल.
कर निर्धारक व संकलक अपर्णा थेटे यांनी बुधवारी सांगितले की, नागरिकांना मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी मनपाच्या ९ प्रभाग कार्यालयामध्ये जावे लागत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, तसेच नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या सूचनेनुसार प्रभाग कार्यालयांतर्गत प्रत्येकी पाच वसुली केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रत्येक प्रभागामध्ये एक केंद्र सुरू केले आहे. हे केंद्र सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. नागरिकांनी जवळच्या केंद्रावर त्वरित मालमत्ता कर, पाणीपट्टीचा भरणा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रभागनिहाय कर भरणा केंद्रे...
प्रभाग- १ : वॉर्ड क्रमांक १७, नंदनवन कॉलनी, मनपा शाळा, उद्यानाच्या बाजूला
प्रभाग- २ : वाॅर्ड क्रमांक ५५, भवानीनगर, जुने प्रभाग कार्यालय, आरोग्य केंद्राजवळ
प्रभाग- ३ : वाॅर्ड क्रमांक २५, गणेश कॉलनी, मनपा शाळा.
प्रभाग- ४ : वाॅर्ड क्रमांक ४, चेतनानगर, मनपा शाळा
प्रभाग- ५ : वाॅर्ड क्रमांक ३९, अयोध्यानगर एन-७, मापारी हॉस्पिटलच्या पाठीमागे
प्रभाग- ७ : वाॅर्ड क्रमांक ८९, चिकलठाणा, मनपा शाळा
प्रभाग- ७ : वाॅर्ड क्रमांक ६५, सुराणानगर, सेव्हन हिल अग्निशमन केंद्र
प्रभाग- ८ : वाॅर्ड क्रमांक १०६, कांचनवाडी मनपा शाळा
प्रभाग- ९ : वाॅर्ड क्रमांक १०४, बन्सीलालनगर, मनपा शाळा