विनानिविदा आऊटसोर्सिंगचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:59 AM2017-12-20T00:59:23+5:302017-12-20T00:59:27+5:30

महापालिकेत मागील काही महिन्यांपासून आऊटसोर्सिंगची जोरदार धूम सुरू आहे. कोणतेही काम आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून करण्यावर अधिक ‘भर’ देण्यात येत आहे.

 Proposal of discounted outsourcing | विनानिविदा आऊटसोर्सिंगचा प्रस्ताव

विनानिविदा आऊटसोर्सिंगचा प्रस्ताव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेत मागील काही महिन्यांपासून आऊटसोर्सिंगची जोरदार धूम सुरू आहे. कोणतेही काम आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून करण्यावर अधिक ‘भर’ देण्यात येत आहे. शहरात रात्रीही साफसफाई करावी, अशी मागणी जोर धरताच प्रशासनाने विनानिविदा एका खाजगी एजन्सीमार्फत ५० मजूर नियुक्त करण्यास मान्यता दिली. नेहमी नियमांवर बोट ठेवणाºया प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून २२ डिसेंबर रोजी होणाºया स्थायी समितीसमोर प्रस्तावही सादर केला आहे.
महापालिकेत बचत गटामार्फत साफसफाई करण्यात येते. एका खाजगी एजन्सीकडून सुरक्षारक्षक, वसुलीसाठी कर्मचारी, पाणीपुरवठ्यासाठी लाईनमन घेण्यात आले आहेत. याशिवाय संगणक आॅपरेटर म्हणून आऊटसोर्सिंग करण्यात आले आहे. कचरा उचलण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांचे आऊटसोर्सिंग केले आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये आऊटसोर्सिंगवर खर्च होत आहेत. मागील महिन्यात महापौर नंदकुमार घोडेले यांनी बाजारपेठेतही रात्री साफसफाई करण्यात यावी, अशी सूचना प्रशासनाला केली. मनपा कर्मचाºयांमार्फत किंवा बचत गटामार्फत काम करावे, असा त्यांचा संदर्भ होता. मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी २२ डिसेंबर रोजी होणाºया स्थायी समितीच्या बैठकीत एक प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावात नमूद केले आहे की, केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणात रात्री सफाई केल्यास मनपाला अधिक गुण मिळणार आहेत. मनपात एक संस्था ज्या दरात मजूर पुरविण्याचे काम करीत आहे, त्याच दरात सर्वज्ञ एजन्सी ५० कर्मचारी मनपाला पुरविणार आहे. यातून रात्री बाजारपेठेत साफसफाई करण्यात येईल.
एका मजुराला दरमहा १३ हजार ९५० रुपये मनपाला द्यावे लागतील, असे प्रस्तावात नमूद केले आहे.
सर्वज्ञ एजन्सीला दोन महिन्यांपूर्वीच परवाना मिळालेला आहे. या एजन्सीकडे कोणताही अनुभव नाही.
निविदा प्रक्रिया पार न पाडता थेट काम कसे काय देण्यात येत आहे. हा प्रस्ताव त्वरित थांबविण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेता फेरोज खान यांनी आयुक्तांकडे केली आहे.
निविदा का नाही
महापालिकेला कोणतेही काम खाजगी एजन्सीकडून करून घ्यायचे असल्यास निविदा पद्धतीचा अवलंब करावा लागतो. एक खाजगी एजन्सी मनुष्यबळ पुरविण्याचे काम घेत असताना मनपाने निविदा पद्धतीचा अवलंब का केला नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अशी कोणती आणीबाणीची परिस्थिती होती की, निविदा न मागविता एका एजन्सीला लाखो रुपयांचे काम देण्यात येत आहे.

Web Title:  Proposal of discounted outsourcing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.