देवगिरी महाविद्यालयाचा विद्यापीठाकडे स्वायत्त होण्यासाठी प्रस्ताव
By योगेश पायघन | Published: February 27, 2023 06:56 PM2023-02-27T18:56:14+5:302023-02-27T18:56:57+5:30
देवगिरी महाविद्यालय स्वायत्ततेच्या दिशेने प्रवास करत असल्याचे मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये स्पष्ठ केले होते. त्यानुसार महाविद्यालयाने पाऊले टाकली.
छत्रपती संभाजीनगर ः मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे देवगिरी महाविद्यालय हे आगामी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून स्वायत्त होणार आहे. त्यासाठी डाॅ. बाबाासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी सादर केला. आवश्यक शिफारशीसह हा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाला पाठवण्यात येईल. युजीसीच्या मान्यतेनंतर महाविद्यालय स्वायत्त होईल. अशी अशी माहीती कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी दिली.
प्राचार्य डाॅ. अशोक तेजणकर म्हणाले, देवगिरी महाविद्यालय स्वायत्ततेच्या दिशेने प्रवास करत असल्याचे मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये स्पष्ठ केले होते. त्यानुसार महाविद्यालयाने पाऊले टाकली. सोमवारी विद्यापीठाकडे स्वायत्ततेचा प्रस्ताव सादर केला आहे. महाविद्यालयाला नॅकने ए प्लस प्लस दर्जा दिला आहे. हा दर्जा पुढील सात वर्षांसाठी आहे. देवगिरी महाविद्यालयात पदवीचे १५ अभ्यासक्रमाचे साडे सहा हजार विद्यार्थी शिकत असून पदव्युत्तरचे २२ अभ्यासक्रमात २ हजार विद्यार्थी शिकत आहे. पीएचडी संशोधनाचे १२ विषयांचे रिसर्च सेंटर आहेत. पदवीचे ६ विषय अनुदानित आहेत. महाविद्यालय स्वायत्त झाल्यानंतर अनुदानित विषयांच्या विद्यार्थी शुल्कात फरक पडणार नाही. मात्र, ज्या विषयांना अनुदान नाही, त्याचे शुल्क महाविद्यालय ठरवेल. युजीसीच्या मान्यतेनंतर आगामी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या सत्रापासून देवगिरी महाविद्यालय स्वायत्त होईल. त्यामुळे महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया, परीक्षा घेणे, पदवी प्रदान करणे हे सर्वच शैक्षणिक कार्य महाविद्यालयातर्फे करण्यात येणार येईल.
नव्या शैक्षणिक धोरणाकडे वाटचाल...
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पारंपारीक शिक्षण देणारे पहिले महाविद्यालय स्वायत्ततेसाठी पुढे आले आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार स्वयंपुर्ण मोठ्या महाविद्यालयांना, संस्थांना स्वायत्त होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्यााचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले म्हणाले. तर स्वायत्त झाल्याने उद्योग, स्वयंरोजगार पुरक अभ्यासक्रम सुरू करता येतील. विद्यार्थ्यांना काैशल्यवाढीचे शिक्षण,नव्या शैक्षणिक धोरणानुसार सोयी सुविधा देता येईल. असे प्राचार्य डाॅ. तेजनकर म्हणाले.