जिल्ह्यात पाच ग्रामीण रुग्णालयांचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:06 AM2021-06-09T04:06:01+5:302021-06-09T04:06:01+5:30
औरंगाबाद : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम होण्यासाठी शिऊर, लासूर स्टेशन, वाळूज, आडूळ आणि विहामांडवा अशा पाच ग्रामीण ...
औरंगाबाद : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम होण्यासाठी शिऊर, लासूर स्टेशन, वाळूज, आडूळ आणि विहामांडवा अशा पाच ग्रामीण रुग्णालयांचा प्रस्ताव आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही प्रस्तावित आरोग्य केंद्रे लवकरात लवकर सुरू करण्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्यात याव्यात. आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यामध्ये ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद सदस्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्तालयात सोमवारी झालेल्या बैठकीत करण्यात आले. या बैठकीला राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जि.प. उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, आरोग्य सभापती अविनाश गलांडे, बांधकाम सभापती किशोर गलांडे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांची उपस्थिती होती.
शिवना आणि गोंदेगाव येथील बंद पडलेले युनानी रुग्णालये दुरुस्तीचे निर्देशही राज्यमंत्री सत्तार यांनी दिले. जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेत गुणवत्तापूर्ण भर घालण्यासाठी नवीन अद्ययावत रुग्णवाहिका खरेदी प्रस्ताव त्याचप्रमाणे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्याबाबत लोकसंख्या आणि स्थानिक गरज लक्षात घेता प्रस्ताव सादर करण्याची सूचना राज्यमंत्री सत्तार यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला केली.
---------------------------------------
लोकशाही दिनात ३ तक्रारी प्राप्त
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात ७ जून रोजी झालेल्या लोकशाही दिनात ३ तक्रारी दाखल झाल्या. त्यामध्ये जिल्हा परिषद १, महसूल विभाग २ अशा एकूण ३ तक्रारी दाखल झाल्या.