नव्या ठाण्यांचे प्रस्ताव धूळ खात

By Admin | Published: March 26, 2017 11:24 PM2017-03-26T23:24:23+5:302017-03-26T23:26:00+5:30

लातूर :पानगाव आणि नळेगाव येथील स्वतंत्र पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात आला

Proposals of new stops eat dust | नव्या ठाण्यांचे प्रस्ताव धूळ खात

नव्या ठाण्यांचे प्रस्ताव धूळ खात

googlenewsNext

लातूर : जिल्ह्यातील पोलीस दप्तरी संवेदनशील म्हणून नोंद असलेल्या पानगाव आणि नळेगाव येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात आला असून, अद्याप या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही.
रेणापूर, चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण, भौगोलिक अंतर आणि वाढत्या लोकसंख्येनुसार या दोन्ही ठाण्यांचे कायदा व सुव्यवस्थेसाठी विभाजन होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वतंत्र नव्या ठाण्यांचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने एप्रिल २०१६ मध्ये राज्य शासनाच्या गृहविभागाकडे पाठविण्यात आला आहे. पानगावातील आठवडी बाजार आणि साखर कारखान्यासाठी बीड जिल्ह्यातील किमान ३० वाड्या, वस्त्यांमधून मजूर येतात. गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ती परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस बळ अपुरे पडते. पानगाव येथील वारंवार घडणाऱ्या घटना, लातूर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या गावात होणारी गुन्हेगारी, २००८ ची जातीय दंगल, २०११ व २०१६ मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनांमुळे हे गाव संवेदनशील बनले आहे. त्यामुळे येथे नवीन पोलीस ठाणे स्थापन करावे, असा प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडून पाठविण्यात आले आहेत. पानगावात पोलीस चौकी असून, एक पोलिस उपनिरीक्षक, पाच पोलीस कर्मचारी तात्पुरत्या नियुक्तीवर आहेत. पानगाव हद्दीत १६ गावे तसेच किनगाव पोलीस ठाण्यांतर्गत रेणापूर तालुक्यातील (अधिक वृत्त हॅलो/२ वर)

Web Title: Proposals of new stops eat dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.