शेंद्रा परिसरात कोरडवाहूला आली समृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:02 AM2021-02-16T04:02:01+5:302021-02-16T04:02:01+5:30
समृद्धी महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. त्याचा मोबदलाही शासनाने चांगल्या प्रकारे दिला. त्यातून हजारो शेतकरी आर्थिक समृद्ध ...
समृद्धी महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. त्याचा मोबदलाही शासनाने चांगल्या प्रकारे दिला. त्यातून हजारो शेतकरी आर्थिक समृद्ध झाल्याचे दररोजच्या दैनंदिन व्यवहारात पाहायलाही मिळते.
वरुड काजी येथील हेलदरी नामक तलावातून अंदाजे २,८७,००० क्यूबिक मीटर माती व मुरूम गाळ स्वरूपात काढला गेला. या तलावात जवळपास २७ कोटी ५० लाख लिटर पाणी जास्त प्रमाणात साठविले गेल्याने या तलावातील पाणी हे शेतकऱ्यांसाठी जीवनभराची समृद्धी आणणारे ठरले आहे.
२०१९ व २० या पावसाळी हंगामात पाऊस सर्व मंडळात धो-धो कोसळल्याने सर्व प्रकारातील तलाव पूर्ण क्षमतेने भरले. परिणामी ज्या भागात जानेवारी महिन्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते, त्या भागांमध्ये आजघडीला उत्तम पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे, तर गावातील काही तरुण मत्स्य व्यवसाय करण्याकडे आपले लक्ष केंद्रित करत असल्याचे चित्र आहे. तलावाच्या शेजारील ७० ते ८० एकर जमीन आता ओलिताखाली येण्याची शक्यता बळावली असून, हे गाव शहराच्या अगदी जवळ असल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि फळ पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे.
उपयुक्त जलसाठा....
तलावातील गाळ उपशाने पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. येत्या जूनपर्यंत पुरेल आणि विहिरीही साथ देत आहे, अशी स्थिती आहे. उन्हाळी हंगामात मुबलक प्रमाणात पाणी ही शेतकऱ्यांना सुवर्ण संधी आहे.
- शेखर दांडगे (प्रगतशील शेतकरी)
कॅप्शन...
हेलदरी तलावात असलेला पाणीसाठा.