एन ४ परिसरातील स्पा मध्ये वेश्या व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 01:48 PM2020-09-27T13:48:58+5:302020-09-27T13:50:34+5:30
सिडको एन ४ या उच्चभ्रू वसाहतीमधील पुंडलिकनगर रस्त्यावर हा स्पा सुरू होता. याविषयी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात स्पा चालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. दत्तू माने, संदीप भालेराव, अमोल भालेराव ( रा. नाशिक ) अशी स्पा चालक आरोपींची नावे आहेत.
औरंगाबाद : स्पा च्या आडून वेश्या व्यवसाय करणाऱ्या एलोरा स्पा सेंटरवर पुंडलिकनगर पोलिसांनी शनिवारी दुपारी बनावट ग्राहक पाठवून कारवाई करण्यात आली. या कारवाईत नागालँडच्या दोन तरूणींसह स्थानिक २ रिसेप्शनिस्ट तरूणी आणि दोन नोकर यांना ताब्यात घेतले.
सिडको एन ४ या उच्चभ्रू वसाहतीमधील पुंडलिकनगर रस्त्यावर हा स्पा सुरू होता. याविषयी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात स्पा चालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. दत्तू माने, संदीप भालेराव, अमोल भालेराव ( रा. नाशिक ) अशी स्पा चालक आरोपींची नावे आहेत.
याविषयी सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले की, आरोपींनी सिडको एन ४ मधील एलोरा स्पा ॲण्ड वेलनेस सेंटर प्रा. लि. या नावाने स्पा सेंटर उघडले होते. या स्पा सेंटरवर ग्राहकांना ऑनलाईन बुकींगनंतर प्रवेश देत मसाज करण्याचा दर २ ते ८ हजार रूपये होता. याविषयीची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. बनावट ग्राहकाने स्पा च्या क्रमांकावर फोन केला असता त्याला शनिवारी दु. १ वा. येण्यास सांगितले. बनावट ग्राहक तेथे गेल्यानंतर त्याच्याकडून २ हजार रूपये घेऊन मसाज करण्यासाठी त्यांना एका रूममध्ये नेले आणि तरूणीला तेथे पाठविले. यावेळी पोलिसांच्या पंटरने तिच्याकडे सेक्ससाठी विचारले असता तिने दोन हजार रूपयांची अतिरिक्त मागणी केली. यानंतर पंटरने खिडकीतून इशारा करताच पोलिसांनी धाड टाकली.
या कारवाईत नागालँडच्या दोन तरूणी, रिसेप्शनीस्ट तरूणी आणि बबलू बाळकृष्ण इंगळे व आकाश राजू पगडे या दोन नोकरांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात नेले.