मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना अटकेच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये बसवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 07:17 PM2017-12-18T19:17:40+5:302017-12-18T19:54:31+5:30

५९ मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या मागण्या न सोडविणार्‍या राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी नागपूर येथे गेलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पोलिसांनी अटक केली. याबद्दल सरकारचा निषेध करण्यासाठी छावा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी बसवर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच आंदोलनकर्ते पळून गेले.

A protest rally in Aurangabad, protesting against the arrest of Maratha Kranti Morcha coordinator | मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना अटकेच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये बसवर दगडफेक

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना अटकेच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये बसवर दगडफेक

googlenewsNext

औरंगाबाद : ५९ मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या मागण्या न सोडविणार्‍या राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी नागपूर येथे गेलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पोलिसांनी अटक केली. याबद्दल सरकारचा निषेध करण्यासाठी छावा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी बसवर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच आंदोलनकर्ते पळून गेले.

मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण द्यावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजाने राज्यात तब्बल ५९ मोर्चे काढले. ९ आॅगस्ट रोजी मुंबईत महामोर्चा मराठा क्रांती मोर्चाने काढला. प्रत्येक मोर्चाच्या प्रसंगी शासनाला निवेदन दिले आणि शासनाने मागण्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिले. शासनाने मराठा समाजाला केवळ गृहीत धरले. समाजाच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत. याबाबत शासनाला जाब विचारण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक नागपूर येथे अधिवेशनस्थळी गेले होते. त्यावेळी शासनाच्या आदेशाने पोलिसांनी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना अटक केली.

शासनाची ही दादागिरी असल्याचे नमूद करून छावा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी अक्कलकोट ते चाळीसगाव या एस. टी. बसवर दगडफेक के ली. ही बस सिडको बसस्थानक येथून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जात होती. उच्च न्यायालयासमोरील पुलाजवळ बस असताना आंदोलनकर्त्यांनी बस अडविली. यावेळी एस. टी. बसचालक विजय त्रिंबक अहिरराव यांनी बस थांबविताच आमचे हे आंदोलन असून, तुम्ही बसच्या खाली उतरा, असे सांगितले. बसचालक खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. विशेष शाखेचे उपनिरीक्षक गोकुळ चव्हाण हे जळगाव रोडवर असताना या आंदोलनाची त्यांना माहिती मिळाली. ते लगेच एमजीएममार्गे जालना रोडवर आले. त्यांनी  जालना रोड ओलांडून बसकडे धाव घेतली.

यावेळी पोलीस आल्याचे दिसताच आंदोलनकर्ते कारमध्ये बसून घटनास्थळावरून पसार झाले. एका पोलीस अधिकार्‍याने प्रसंगावधान राखून धाव घेतल्याने अन्य वाहनांचे होणारे नुकसान टळले. यावेळी शासनाच्या निषेधाची पत्रके बसमध्ये आंदोलकांनी फेकली. यापुढे अशी अटक झाल्यास राज्य परिवहन सेवा ठप्प क रण्याचा इशारा पत्रकात देण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच सिडको विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे, विशेष शाखेचे सहायक आयुक्त हुनमंतराव गायकवाड, पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती,  पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदिराज आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन बस ठाण्यात नेली. आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले.

Web Title: A protest rally in Aurangabad, protesting against the arrest of Maratha Kranti Morcha coordinator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.