आंबेडकरी अनुयायांवरील अत्याचाराविरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 03:00 PM2020-09-21T15:00:42+5:302020-09-21T15:01:38+5:30

आंबेडकरी अनुयायांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात सोमवारी आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने

Protests against the atrocities on Ambedkar's followers | आंबेडकरी अनुयायांवरील अत्याचाराविरोधात निदर्शने

आंबेडकरी अनुयायांवरील अत्याचाराविरोधात निदर्शने

googlenewsNext

औरंगाबाद : आंबेडकरी अनुयायांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात सोमवार दि. २१ रोजी आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. सरकार विरोधात घोषणा देऊन आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला

कोरोना काळात आक्रमकपणे झालेले हे आंदोलन लक्षवेधी ठरले. कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुध्द जोरदार घोषणा दिल्या आणि सरकार व प्रशासनाविषयीचा रोष व्यक्त केला. याविषयीचे निवेदन समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले असून लॉकडाऊन काळात दलितांवर झालेल्या अन्याय व अत्याचार विरोधात कारवाई करावी, या प्रमुख मागणीसह इतरही काही मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत.

Web Title: Protests against the atrocities on Ambedkar's followers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.