जालन्यातील घटनेचा निषेध; संभाजीनगरमध्येही मराठा बांधव एकवटले
By बापू सोळुंके | Published: September 1, 2023 11:46 PM2023-09-01T23:46:49+5:302023-09-01T23:48:25+5:30
या लाटी हल्ल्यानंतर छत्रपती संभाजी नगर शहरातील मराठा समाजपडसाद उमटू लागले आहेत.
छत्रपती संभाजी नगर : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे येथे मराठा आरक्षण आंदोलकावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याप्रकरणी रात्री उशिरा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी टीव्ही सेंटर येथे निदर्शने केली .जालना जिल्ह्यातील अंतरवाली सरावाटे येथे शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मराठा समाजातील महिला व पुरुष आंदोलकावर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी अचानक लाठी हल्ला केला.
या लाठी हल्ल्यानंतर छत्रपती संभाजी नगर शहरातील मराठा समाजपडसाद उमटू लागले आहेत. बीड बायपास वर कार्यकर्त्यांनी टायर्स जाळून रस्ता रोको केला .यानंतर साय रात्री अकरा वाजेच्या सुमारास टीव्ही सेंटर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मराठा क्रांती मोर्चा च्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. राज्य सरकारचा निषेध असो, आंदोलकावर लाठी हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करा , आदी घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला .मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक सुरेश वाकडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.