महागाईविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:04 AM2021-06-18T04:04:46+5:302021-06-18T04:04:46+5:30
पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडल्यामुळे जीवनावशक वस्तूंचे भाव वाढले. त्यामुळे गोरगरीब जनतेला अडचणींचा सामना करावा ...
पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडल्यामुळे जीवनावशक वस्तूंचे भाव वाढले. त्यामुळे गोरगरीब जनतेला अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यावर काहीही उपाययोजना करताना दिसत नाही. कोविडच्या संकटामुळे अगोदरच सामान्य जनता मेटाकुटीला आलेली असताना भाववाढ हे नवीन न झेपणारे संकट आहे, अशी भूमिका माकपने मांडली आहे.
शेतकऱ्यांची खासगी व सहकारी दूध संघाकडून होणारी लूट त्वरित थांबवावी. लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करावी, आदिवासी शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या प्रमाणे खावटी अनुदान त्वरित देण्यात यावी, वृद्ध, अपंग, विधवा, परित्यक्ता यांना १ हजार रुपये मानधनाची घोषणा करण्यात आली होती, याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. करण्यात आलेल्या निदर्शनात कॉ. लक्ष्मण साक्रुडकर, कॉ. श्रीकांत फोपसे, कॉ. भाऊसाहेब झिरपे, कॉ. बाबासाहेब वावळकर, कॉ. भानुदास चौधरी, कॉ. सचिन गंडले, कॉ. विश्वनाथ शेळके, कॉ. सतीश कुलकर्णी, कॉ. सुनील राठोड, कॉ. शंकर ननुरे, कॉ. मंगल ठोंबरे, कॉ. अजय भवलकर, कॉ. नितीन वावळे, प्रकाश पाटील. कॉ. गोरख राठोड, कॉ. विशाल भुमरे आदींनी भाग घेतला.