विविध मागण्यांसाठी समाजवादीतर्फे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:51 AM2017-09-29T00:51:19+5:302017-09-29T00:51:19+5:30
येथील गांधी चौक येथे समाजवादीपार्टी इंधनावाढीचा निषेध करुन विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील गांधी चौक येथे समाजवादीपार्टी इंधनावाढीचा निषेध करुन विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
सध्याचे सरकार नियमित डिझेल, पेट्रोल, गॅस दरवाढ, रेल्वे तिकट, एस. टी. तिकट, वीज बिल, दूध, युरिया खत आदींची दरवाढ करीत असल्याने सर्वसामान्य महागाईने होरपळून निघाले आहेत. तर महिलांवर वाढणारे अत्याचार आणि पत्रकारांवरील हल्ले याचा सर्वाचा समाजवादी पक्षातर्फे निषेध करण्यात आला. विद्यार्थिनींवर व पत्रकारावर हल्ला करणाºयावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसह जीवनावश्यक वस्तूचे दर कमी करावे, अवाजवी इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तर सन २०१३- १४ मध्ये पेट्रोलवर ७ रुपये २८ पैसे कर आकारला जात होता. तर आता २४ रुपये ४६ पैसे तर डिझेलवर ३ रुपये २८ पैसे आकारला जात असताना आज १८ रुपये ३६ पैसे कर आकारला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. इतरही वस्तूवर जास्त प्रमाणात कर आकारला जात आहे. निवेदनावर शेख नईम शेख लाल यांची स्वाक्षरी आहे.