नादुरुस्त व्हेंटिलेटरबाबत सविस्तर माहिती सादर करा; केंद्राच्या असिस्टंट सॉलिसिटर जनरलला खंडपीठाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 12:19 PM2021-05-26T12:19:02+5:302021-05-26T12:22:28+5:30

नादुरुस्त व्हेंटिलेटर प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका, तुम्ही तज्ज्ञ नाहीत, उगीच रुग्णांच्या जीवाशी खेळू नका, अशी ताकीदही खंडपीठाने राजकीय नेत्यांना दिली.

Provide detailed information about faulty ventilators; Order of the Aurangabad Bench to the Assistant Solicitor General of the Central Government | नादुरुस्त व्हेंटिलेटरबाबत सविस्तर माहिती सादर करा; केंद्राच्या असिस्टंट सॉलिसिटर जनरलला खंडपीठाचे आदेश

नादुरुस्त व्हेंटिलेटरबाबत सविस्तर माहिती सादर करा; केंद्राच्या असिस्टंट सॉलिसिटर जनरलला खंडपीठाचे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देनादुरुस्त व्हेंटिलेटर बदलून देण्याबाबत केंद्र शासनाचे काय धोरण आहे

औरंगाबाद : निकृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटरबाबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने केंद्र शासनाचे वकील असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्हार यांना या व्हेंटिलेटरबाबत सविस्तर माहिती घेऊन नादुरुस्त व्हेंटिलेटर बदलून देण्याबाबत केंद्र शासनाचे काय धोरण आहे, याची माहिती शुक्रवारी सादर करण्याचा आदेश मंगळवारी दिला.

न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी. यू. देबडवार यांच्यासमोर मंगळवारी फौजदारी सुमोटो जनहित याचिकेवर सुनावणी झाली असता ‘लोकमत’ने १२ ते २५ मे दरम्यान पीएम केअर फंडातून मिळालेल्या व्हेंटिलेटर्सपैकी बहुतांश नादुरुस्त असल्याबाबत सर्वप्रथम वृत्त प्रकाशित केले होते. तसेच व्हेंटिलेटर उत्पादक कंपन्यांचे अभियंतेही निरुपयोगी व्हेंटिलेटर दुरुस्तीसाठी हतबल ठरल्याबाबत, व्हेंटिलेटर बदलून घेण्याऐवजी बिघडलेले व्हेंटिलेटर दुरुस्तीचा खटाटोप चालू असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या सर्वांची दखल खंडपीठाने घेत वरील आदेश दिले.

आजच्या सुनावणीत न्यायालयाचे मित्र ॲड. सत्यजित बोरा, राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे, केंद्र शासनातर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल अजय तल्हार, औरंगाबाद महापालिकेतर्फे ॲड. संतोष चपळगावकर, नांदेड महापालिकेतर्फे ॲड. राधाकृष्ण हिंगोले, परभणी महापालिकेतर्फे ॲड. धनंजय शिंदे आदींनी काम पाहिले. सुनावणीस घाटी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर आणि अन्न व औषधी विभागाचे वरिष्ठ अधिकारी हजर होते.

राजकारण्यांंना बजावले
नादुरुस्त व्हेंटिलेटर प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका, तुम्ही तज्ज्ञ नाहीत, उगीच रुग्णांच्या जीवाशी खेळू नका, अशी ताकीदही खंडपीठाने राजकीय नेत्यांना दिली.

म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी औरंगाबादेतील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
१. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) आणि रुग्णालय.
२. डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल.
३. महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल.
४. एमआयटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट
५. कमलनयन बजाज हॉस्पिटल.
६. सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल.
७. युनायटेड सिग्मा हॉस्पिटल.
तसेच
राज्यातील १३० सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
मुंबई-६, मुंबई सबर्बन-८, ठाणे-९, पालघर-१, रायगड-३, पुणे-१०, सोलापूर-४, सातारा-३, कोल्हापूर-५, बेळगाव-१, सांगली-४, रत्नागिरी-२, सिंधुदुर्ग-२, नाशिक-८, धुळे-६, जळगाव-२, अहमदनगर-८, नंदुरबार-१, औरंगाबाद-७, जालना-४, परभणी-२, हिंगोली-१, बीड-२, उस्मानाबाद-१, लातूर-३, नांदेड-२, अमरावती-४, अकोला-१, बुलडाणा-२, वाशिम-१, यवतमाळ-२, नागपूर-७, वर्धा-२, भंडारा-१, गोंदिया-१, चंद्रपूर-३ आणि गडचिरोली-१.

Web Title: Provide detailed information about faulty ventilators; Order of the Aurangabad Bench to the Assistant Solicitor General of the Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.