घरेलू महिलांना सरकारने देऊ केलेली १५०० रुपयांची आर्थिक मदत तात्काळ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:02 AM2021-09-23T04:02:26+5:302021-09-23T04:02:26+5:30
औरंगाबाद : कोरोनासारख्या महाभयंकर साथरोगामुळे संपूर्ण देश बंद करण्यात आला. त्यामुळे हातावर काम असणाऱ्यांचे अतोनात हाल झाले. असंघटित क्षेत्रातील ...
औरंगाबाद : कोरोनासारख्या महाभयंकर साथरोगामुळे संपूर्ण देश बंद करण्यात आला. त्यामुळे हातावर काम असणाऱ्यांचे अतोनात हाल झाले. असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आंदोलने करावी लागली.
राज्य सरकारने नोंदणीकृत घरेलू महिलांना १५०० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यानुसार लाल बावटा घरेलू मोलकरीण संघटना आयटकने जुन्या व नवीन नोंदणीकृत घरकाम करणाऱ्या महिलांना तात्काळ मदत द्यावी. ६० वर्षांवरील नोंदणीकृत महिला कामगारांना दहा हजार रुपयांची मिळणारी मदत वाढीव स्वरूपात द्यावी. घरेलू महिलांना पेन्शन लागू करा. घरेलू महिला कामगारांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी बांधकाम कामगाराच्या धर्तीवर शिष्यवृत्ती मंजूर करा आदी मागण्या करण्यात आल्या. शासनाने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मधुकर खिल्लारे, प्रमिला मानकरी, शकुंतला दांडगे, वैशाली भालेकर आदींसह शिष्टमंडळाने दिला आहे.