यंत्रसामुग्री, औषधी खरेदीसाठी २ कोटींचा निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:03 AM2021-07-04T04:03:56+5:302021-07-04T04:03:56+5:30

औरंगाबाद : कोरोनाची तिसरी लाट येईल, त्यादृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश शासनाने महापालिकेला दिले आहेत. मनपाने तयारी सुद्धा सुरू केली ...

Provide Rs. 2 crore for purchase of machinery and medicines | यंत्रसामुग्री, औषधी खरेदीसाठी २ कोटींचा निधी द्या

यंत्रसामुग्री, औषधी खरेदीसाठी २ कोटींचा निधी द्या

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोनाची तिसरी लाट येईल, त्यादृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश शासनाने महापालिकेला दिले आहेत. मनपाने तयारी सुद्धा सुरू केली असून यंत्रसामुग्री, औषधी खरेदीसाठी २ कोटीचा निधी द्यावा, अशी मागणी मनपाने शासनाकडे केली आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्तावही दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून या लाटेत बालकांना सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. महापालिकेने गरवारे कंपनीत बाल कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच एमजीएममध्ये देखील बाल कोविड सेंटर उभारले जाणार आहे. मेल्ट्रॉनमध्ये ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाच्या डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येणार असून आठ बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची कंत्राटी पध्दतीने निवड करण्यात आली. त्यासोबतच यंत्रसामुग्री, औषधी खरेदीची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये व्हीटीएम किट, रॅपीड ॲन्टिजन किट, आरटीपीसीआर किट, बालकांसाठी लागणारी औषधी, विविध प्रकारच्या गोळया, व्हेंटिलेटर, बायपॅक मशीन, लहान व्हेंटिलेटरची गरज आहे. साहित्य खरेदीसाठी २ कोटीचा निधी लागणार आहे. हा निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडून उपलब्ध करून द्यावा याकरिता मनपाने प्रस्ताव दाखल केला आहे.

Web Title: Provide Rs. 2 crore for purchase of machinery and medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.