‘लोकमत सखी सन्मान’ थाटात प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:19 AM2017-11-10T00:19:38+5:302017-11-10T00:19:49+5:30
जिच्याशिवाय हे विश्व अपूर्ण राहिले असते. ती म्हणजे स्त्री. खरतर एक स्त्री नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत आपल्या जबाबदाºया पार पाडत असते. अशा ‘सामान्य ते असामान्य’ असा प्रवास करणाºया आठ स्त्रीयांच्या कर्तृत्वाला ‘लोकमत’तर्फे ‘सखी सन्मान अवॉर्ड’ देवून सलाम करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिच्याशिवाय हे विश्व अपूर्ण राहिले असते. ती म्हणजे स्त्री. खरतर एक स्त्री नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत आपल्या जबाबदाºया पार पाडत असते. अशा ‘सामान्य ते असामान्य’ असा प्रवास करणाºया आठ स्त्रीयांच्या कर्तृत्वाला ‘लोकमत’तर्फे ‘सखी सन्मान अवॉर्ड’ देवून सलाम करण्यात आला.
केमिस्ट भवन येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात भरीव काम करणाºया, प्रसिद्धीपासून दूर राहून आपल्या कार्याचा ठसा उमटवणाºया आठ सखींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा शिवरानी नरवाडे व समाजकल्याण सभापती सुनंदा नाईक यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. आशिष मिठारी यांनी तयार केलेल्या ‘सखी सन्मान सोहळा’ या शिर्षक गीताचे सादरीकरण झाले. प्रमोद शर्मा प्रस्तुत एक्स्प्रेशन डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्याविष्काराचे सादरीकरण केले. यावेळी यशस्वी कामगिरी करणाºया महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील सात सखींसह आरती मार्डीकर यांना त्यांच्या कारकिर्दीतील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी महिलांना समाज संघटनेविषयी तसेच महिलांच्या जनजागृतीविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.