गटशेतीसाठी २०० कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:57 AM2017-10-17T01:57:19+5:302017-10-17T01:57:19+5:30

टशेतीच्या माध्यमातून शेतक-यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी राज्य शासनाने गटशेती योजना तयार केली असून, त्यासाठी दोनशे कोटींची तरतूद केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.

A provision of 200 crores for group farming | गटशेतीसाठी २०० कोटींची तरतूद

गटशेतीसाठी २०० कोटींची तरतूद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : गटशेतीच्या माध्यमातून शेतक-यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी राज्य शासनाने गटशेती योजना तयार केली असून, त्यासाठी दोनशे कोटींची तरतूद केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.
जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथे १४६ व्या द्वादश कार्यक्रमानिमित्त गटशेती करणा-या शेतक-यांचा मेळावा आणि गटशेती पाहणी कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, सीईओ दीपक चौधरी, फळबाग शास्त्रज्ज्ञ डॉ.भगवान कापसे, जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, तालुका अध्यक्ष गोविंदराव पंडित, सभापती साहेबराव कानडजे, चेरमन विजयनाना परिहार, जि.प. शालिकराम म्हस्के, संतोष लोखंडे, आशा पांडे, तुकाराम जाधव, शिवाजीराव थोटे, सुरेश दिवटे, मुकेश चिने, नाना भागिले, सुधीर पाटील, प्रदीप मुळे, दत्तू पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की गटशेती ही काळाची गरज आहे. जालना जिल्ह्यातील गटशेतीचे मॉडेल राज्य शासनाने स्वीकारले असून, गटशेती करणा-या शेतक-यांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या कृषी योजनांचा लाभ दिला जाईल. १८ आॅक्टोबरपासून कापूस उत्पादक शेतक-यांसाठी शासनाचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला नोंदणी करून टोकन पद्धतीने कापूस खरेदी करून घेतला जाईल. त्यामुळे शेतक-यांनी व्यापाºयांना कापूस न देता शासनाच्या कापूस खरेदी केंद्रावर द्यावा.
गटशेती प्रणेते डॉ. भगवान कापसे यांनी माहिती दिली. या वेळी खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, आ.संतोष दानवे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गटशेती करणारे चांगुणाबाई बाळू कापसे यांच्या शेतातील शेत तळे, द्राक्ष बागेची पाहणी केली. जीवरेखा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधा-यामध्ये अडविण्यात आलेल्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. तसेच राजूर ते टेंभूर्णी महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन झाले. उद्धव दूनगहू यांनी सूत्रसंचालन केले तर गोविंदराव पंडित यांनी आभार मानले.

Web Title: A provision of 200 crores for group farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.