अडीच हजारांची लाच घेणारा पं. सं. चा वरिष्ठ कारकून पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:04 AM2021-09-22T04:04:32+5:302021-09-22T04:04:32+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांच्या शेतात रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर खोदली होती. या विहिरीचे ...

Pt. No. Caught the senior clerk of | अडीच हजारांची लाच घेणारा पं. सं. चा वरिष्ठ कारकून पकडला

अडीच हजारांची लाच घेणारा पं. सं. चा वरिष्ठ कारकून पकडला

googlenewsNext

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांच्या शेतात रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर खोदली होती. या विहिरीचे बांधकामही त्यांनी नुकतेच केले होते. या कामाचे पैसे मिळण्यासाठी त्यांनी फुलंब्री पंचायत समिती कार्यालयात अर्ज दाखल केला होता. पैसे मंजूर करून देण्यासाठी सराटे यांनी तक्रारदारांकडून ४ हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे सराटेची तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली तेव्हा सराटेने पुन्हा चार हजार रुपयांची मागणी केली आणि तडजोड करत अडीच हजार रुपये घेण्याची तयारी दर्शविली.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीला पकडण्यासाठी फुलंब्री येथील पंचायत समिती कार्यालय परिसरात सापळा रचला तेव्हा सराटे याने तक्रारदार शेतकऱ्याकडून लाचेचे अडीच हजार रुपये घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक हनुमंत वारे यांनी केली. त्यांना पोलीस निरीक्षक दीपाली निकम, बाळासाहेब राठोड, सुनील पाटील यांनी सहाय्य केले.

Web Title: Pt. No. Caught the senior clerk of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.