पंढरपुरात विद्यार्थ्यांकडून वाहतूक नियमाविषयी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:09 AM2021-02-20T04:09:47+5:302021-02-20T04:09:47+5:30
वाहतुकीच्या नियमाची फारशी माहिती वाहनधारकांना नसल्यामुळे अपघाताच्या घटना घडत असतात. वाहनधारकांना वाहतूक नियमाची माहिती व्हावी तसेच वाढते अपघात टाळण्यासाठी ...
वाहतुकीच्या नियमाची फारशी माहिती वाहनधारकांना नसल्यामुळे अपघाताच्या घटना घडत असतात. वाहनधारकांना वाहतूक नियमाची माहिती व्हावी तसेच वाढते अपघात टाळण्यासाठी महाविद्यालयाच्या रासयो विभाग व वाळूज वाहतूक शाखेच्या वतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंढरपुरातील तिरंगा चौकात वाहतूक शाखेचे निरीक्षक जनार्धन साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात किसन गायकवाड यांनी वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमाविषयी माहिती दिली. यावेळी जनजागृती अभियानात मास्क व हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना राससोचे विद्यार्थी आरती कदम, मनीषा जाधव, दीपाली अधाने, आकाश चव्हाण, गणेश वाणी, अनिकेत चव्हाण, आकाश रावते, विवेक कदम, लखन जाधव ,राणी काळे, सरोजा बिडवे, कावेरी पेरकर यांनी गुलाबाचे फुल देऊन नियमाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. कल्याण लघाने, उप-प्राचार्य डॉ. संजय सांभाळकर, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक प्रा. अनुजा कंदी, डॉ. रमेश जायभाये, प्रा. डॉ. भरतसिंग सलामपुरे, प्रा. डॉ. नीलिमा काळे, पो. कॉ. अनिल भिसेवाढ, एस. एस. कादरी आदींनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ-
पंढरपुरात देशमुख महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक नियमाची माहिती देऊन हेल्मेट व मास्क न वापरणाऱ्यांना गुलाबाचे फूल भेट दिले.
-----------------------------------
येणुबाई गवळी यांचे निधन
वाळूज महानगर : येणुबाई लक्ष्मण गवळी (१०३, रा. रांजणगाव शेणपुंजी) यांचे शुक्रवारी निधन झाले. येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुली, मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. साहेबराव गवळी यांच्या त्या आई होत.
फोटो क्रमांक- येणुबाई गवळी (निधन फोटो)
----------------------