शिवराई येथे कृषी विभागतर्फे जनजागृती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 09:20 PM2019-05-27T21:20:54+5:302019-05-27T21:21:13+5:30
शिवराई येथे सोमवारी आयोजित कृषी कार्यशाळेत खरीप हंगामातील पिकांविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
वाळूज महानगर: कृषी विभागातर्फे खरीप पिकांविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. शिवराई येथे सोमवारी आयोजित कृषी कार्यशाळेत खरीप हंगामातील पिकांविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
गतवर्षी अनेक पिकांवर अनेक विविध रोगाचा प्रादूर्भाव झाल्याने काढणीला आलेली पिके हातची गेली होती. आर्थिक नुकसान झाल्याने बहुतांशी शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यामुळे यंदा कृषी विभागातर्फे जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
वाळूज महानगरातील शिवराई येथे सोमवारी आयोजित कृषी कार्यशाळेत कृषी शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे यांनी खरीप हंगामातील कापूस, ऊस या पिकाची लागवड करताना कोणत्या बियाणाची निवड करावी, शेतीची मशागत कशी करावी, पिकांवर रोगाचा प्रादूर्भाव झाल्यास पिकांची काळजी कशी घ्यावी, काढणी कोणत्या पद्धतीने करावी या विषयी मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन कृषी सहाय्यक बाबासाहेब टेमकर यांनी केले. तर श्रीकांत कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी कृषी पर्यवेक्षक सुनिल वझे, किशोर राजपूत, तुकाराम नवपुते, शंकर कुंजर, राजाराम सूर्यवंशी, भास्कर बनसोडे, संदीप जाधव, दामोदर गवळी, विठ्ठल कुंजर, मधुकर रोकडे आदी शेतकºयांची उपस्थिती होती.