नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी विद्यापीठाची जनजागृती रॅली
By राम शिनगारे | Published: July 28, 2023 07:11 PM2023-07-28T19:11:19+5:302023-07-28T19:11:19+5:30
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी तयार असल्याचा संदेश
छत्रपती संभाजीनगर : नवीन ’राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’च्या प्रभावी अमंलबजावणीसाठी ’राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-कक्ष’ (एनईपी सेल) स्थापन करण्यात आला आहे. या सेलच्या माध्यमातून शुक्रवारी सकाळी विद्यापीठ प्रवेशद्वारापासून जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी सहभागी नोंदवला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर एनईपी धोरणाच्या जनजागृतीसाठी ’एनईपी-२०२० के लिए है तयार हम’ या ब्रिद वाक्य घेऊन सेल्फी काढण्यात आले. यानंतर ही रॅली प्रवेशद्वारापासून विद्यापीठात आली. त्यामध्ये कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.भारती गवळी, डॉ.एन.एन.बंदेला, डॉ.मुस्तजिब खान, डॉ.संजय कवडे यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते.
या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हानिहाय अंमलबजावणीसाठी ८ ते १० सदस्यांचा ’टास्क फोर्स’ स्थापन केला आहे. बीड जिल्ह्यात प्राचार्य डॉ.गौतम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गट काम करेल. औरंगबााद जिल्ह्यात डॉ. योगिता होके पाटील, जालना प्राचार्य डॉ.भारत खंदारे आणि धाराशिवमध्ये डॉ. अंकुश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या टास्क फोर्समध्ये व्यवस्थापन परिषद सदस्यांसह अधिसभा, विद्यापरिषद आणि प्राचार्यांचा समावेश आहे. विद्यापीठाचे चारही अधिष्ठातांची चार जिल्ह्यांचे समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे.