‘माझा मिलिंदनामा’ पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:04 AM2021-07-10T04:04:27+5:302021-07-10T04:04:27+5:30
मिलिंद विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी, प्राध्यापक व पुढे प्राचार्य अशा ४० वर्षांच्या प्रदीर्घ काळात ‘मिलिंद’ परिसराच्या सहवासात रमलेले प्राचार्य ...
मिलिंद विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी, प्राध्यापक व पुढे प्राचार्य अशा ४० वर्षांच्या प्रदीर्घ काळात ‘मिलिंद’ परिसराच्या सहवासात रमलेले प्राचार्य डॉ. घोबले हे या काळातील संस्थेतील अनेक चढउतारांचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. त्या सर्व घटना डॉ. घोबले यांनी ‘माझा मिलिंदनामा’ या पुस्तकात मांडलेल्या आहेत.
सूत्रसंचालन प्रा. सदाशिव ढाके यांनी केले तर लक्ष्मी घोबले यांनी आभार मानले. कार्यक्रमास ‘मिलिंद’चे आजी-माजी विद्यार्थी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॅप्शन
प्राचार्य डॉ. घोबले लिखित ‘माझा मिलिंदनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना निवृत्त प्राचार्य डॉ. दत्ता देशकर, निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हरिभाऊ साळवे, ॲड. सतीश बोरकर, मनोहर लोंढे, विद्यासागर शिंदे आणि लक्ष्मी घोबले.