शिवाजी सूर्यवंशी यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

By Admin | Published: July 2, 2017 12:17 AM2017-07-02T00:17:21+5:302017-07-02T00:21:26+5:30

नांदेड : यशवंत महाविद्यालयातील प्रा. डॉ़ शिवाजी आनंदराव सूर्यवंशी यांच्या अकरा पुस्तकांचे प्रकाशन श्री शारदा भवन शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा आ़अमिता चव्हाण यांच्या हस्ते झाले़

Publication of books by Shivaji Suryavanshi | शिवाजी सूर्यवंशी यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

शिवाजी सूर्यवंशी यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : यशवंत महाविद्यालयातील प्रा. डॉ़ शिवाजी आनंदराव सूर्यवंशी यांच्या अकरा पुस्तकांचे प्रकाशन श्री शारदा भवन शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा आ़अमिता चव्हाण यांच्या हस्ते झाले़
शिवाजी सूर्यवंशी यांची एकूण बारा पुस्तके आहेत़ त्यापैकी एका पुस्तकाला अंकुर साहित्य संघाचा राज्यस्तरीय विंदा करंदीकर काव्य पुरस्कार प्राप्त आहे़ त्यांच्या अकरा पुस्तकांपैकी पाच पुस्तके समीक्षात्मक, चार काव्यसंग्रह, एक कादंबरी, एक व्याकरणावर आधारित पुस्तक आहे़ या पुस्तक प्रकाशनावेळी आ़ अमिता चव्हाण यांनी साहित्य क्षेत्रात उज्ज्वल यश मिळवून आणखी काही साहित्य लिहिण्याची अपेक्षा व्यक्त केली़ यावेळी श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे सचिव आ़डी़पी़ सावंत, कोषाध्यक्ष गंगाधरराव शक्करवार, सहसचिव उदयनराव निंबाळकर, माजी प्राचार्य ढेंगळे, रावसाहेब शेंदारकर, नरेंद्र चव्हाण, प्राचार्य डॉ़ए़एऩ जाधव, प्रबंधक संदीप पाटील, पर्यवेक्षक पी़पी़ चव्हाण यांच्यासह यशवंत महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद उपस्थित होते़

Web Title: Publication of books by Shivaji Suryavanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.