जुने कायगावातील शिवालयांवरील माहितीपटाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:07 AM2021-03-13T04:07:59+5:302021-03-13T04:07:59+5:30

जुने कायगाव येथील शिवालयांवरील माहितीपटाचे प्रकाशन देवगड संस्थानचे मठाधिपती भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते गुरुवारी झाले. जुने कायगाव येथील श्री ...

Publication of documentary on Shivalayas in Old Kayagawa | जुने कायगावातील शिवालयांवरील माहितीपटाचे प्रकाशन

जुने कायगावातील शिवालयांवरील माहितीपटाचे प्रकाशन

googlenewsNext

जुने कायगाव येथील शिवालयांवरील माहितीपटाचे प्रकाशन देवगड संस्थानचे मठाधिपती भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते गुरुवारी झाले.

जुने कायगाव येथील श्री रामेश्वर, सिद्धेश्वर, मुक्तेश्वर, घटेश्वर आदी ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेल्या महादेव मंदिरावर प्रथमच अभ्यासपूर्ण आणि संदर्भ पुराव्यासह माहितीपट तयार करण्यात आला आहे.

यात परिसरातील रामायणकालीन आख्यायिका, पेशवेकालीन इतिहास तसेच दक्षिणगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे महत्त्व लेखक राहुल कुलकर्णी यांनी विषद केले आहे.

महाशिवरात्रीच्या पर्वावर या माहितीपटाचे प्रकाशन महंत भास्करगिरी महाराज यांनी केले. यावेळी रामेश्वर तनपुरे महाराज, तात्या महाराज शिंदे, बाळु महाराज कानडे, संदीप साबळे, रामचंद्र बिरुटे, राजीव जाधव, दीपक बिरुटे, काटकर गुरुजी यांची उपस्थिती होती.

फोटो ओळ : जुने कायगाव येथील शिवालयांच्या माहितीपटाचे प्रकाशन महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राहुल कुलकर्णी, राजीव जाधवसह आदी.

Web Title: Publication of documentary on Shivalayas in Old Kayagawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.