तीन संस्कृत ग्रंथांचे प्रकाशन
By Admin | Published: September 15, 2014 12:34 AM2014-09-15T00:34:38+5:302014-09-15T00:41:04+5:30
औरंगाबाद :संस्कृत मंजिरी या तीन संस्कृत ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.
औरंगाबाद : संस्कृत दिनाचे औचित्य साधून प्रा.पल्लवी कर्वे लिखित पाणिनीय शिक्षा प्रदीपिका, डॉ. निवेदिता सराफ यांनी अनुवादित केलेले कालिदास चरितम् आणि डॉ. क्रांती व्यवहारे व अभ्यास मंडळाने संपादित केलेल्या संस्कृत मंजिरी या तीन संस्कृत ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.
संस्कृत भारती, गणेश सभा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या संयुक्त विद्यमाने वरद गणेश मंदिर सभागृहात प्रकाशन सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी प्रा. अजय निलंगेकर हे होते. तर उद्घाटक म्हणून प्रकाश राशीनकर उपस्थित होते. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात विश्वनाथ ओक, सविता मुळे, तृष्णा ओक, सुशील डांगे यांनी संस्कृत गीते सादर केली. प्रास्ताविक डॉ. क्रांती व्यवहारे यांनी केले. संचालन प्रज्ञा कोनार्डे यांनी केले. आभार प्रा. माधुरी भावसार यांनी मानले. कार्यक्रमासाठी शुभदा धांडे, सीमा निलंगेकर, सुधा न्यायाधीश यांनी परिश्रम घेतले.