चिंचोली लिंबाजी परिसरात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:05 AM2021-03-24T04:05:51+5:302021-03-24T04:05:51+5:30
चिंचोली लिंबाजी व करंजखेड महसूल मंडळात गेल्या पाच दिवासांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. वादळी वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिल्याने ...
चिंचोली लिंबाजी व करंजखेड महसूल मंडळात गेल्या पाच दिवासांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. वादळी वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिल्याने रबी हंगामातील गहू, मका, हरभरा, कांदा, कांदा बियाणे या पिकांना जबर फटका बसला आहे. चिंचोली लिंबाजी, नेवपूर, वाकी, रेऊळगाव, तळणेर, घाटशेंद्रा, टाकळी अंतूर, लोहगाव, वडोद, बरकतपूर, रायगाव, गणेशपूर, जामडी, वाकद, दहिगाव, शेलगाव, दिगाव, खेडी परिसरात पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेकडो हेक्टरमधील पिकांना याचा फटका बसला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे संयुक्त पंचनामे करण्यात येत असून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांनी कृषी सहायक, तलाठ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांनी केले आहे.
फोटो : चिंचोली लिंबाजीसह परिसरात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत.
230321\20210323_121735_1.jpg
चिंचोली लिंबाजी परिसरात पंचनामे सुरु.